शेतकऱ्यांच्या हितासाठी दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समिती, सभापती सुनिल पाटील गावंडे…

युवराज डोंगरे/दर्यापूर 

         उपसंपादक

           दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही नेहमीच शेतकऱ्यांच्या हितासाठी तत्पर असून त्यांच्या हिताचे निर्णय घेत असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती सुनिल पाटील गावंडे यांनी आज (30) डिसेंबर रोजी पत्रकार परिषदेत दिली.

            दर्यापूर येथिल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये हि माहिती देण्यात आली.

           बाजार समितीचे 25 ते 30 वर्षापासून बंद पडलेले कृषी भवन लवकरच चालू करण्यात येईल कृषी भवन सुरु झाल्यास त्या ठिकाणी तालुक्यातील व शेतकऱ्यांच्या मुला, मुलीचे कमी खर्चात लग्न करता येतील तसेच इतर कार्यक्रम सुद्धा घेता येतील त्यांचा दर सुद्धा कमी राहील.

              दर्यापूर बाजार समितीत आजूबाजूच्या तालुक्यातुन शेतमालाची आवक होते त्या मालाची नासाडी होऊ नये म्हणून सिमेंट रोडला मंजूरात देण्यात आली असून लवकरचे त्याचे भूमिपूजन करण्यात येईल.

            बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांसाठी कापूस विक्री दिं.25 नोव्हेंबरपासून सुरु करण्यात आली असून याला शेतकरी चांगला प्रतिसाद देत आहेत.

            यावेळी बाजार समितीचे उपसभापती राजु पाटील कराळे,संचालक साहेबराव भदे,भारत आठवले, अनिल भारसाकळे उपस्थित होते.