महिलांनी स्वावलंबी झाल्याशिवाय देश पुर्णपणे प्रगत होणे शक्य नाही.

 

भाविक करमनकर 

धानोरा तालुका प्रतिनिधी 

      संपूर्ण राज्यात मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान सुरु असून, कार्यालय नगर पंचायत धानोरा च्या वतीने दिनांक 28 डिसेंबर 2023 रोजी शहरातील डि.एड. कॉलेजच्या प्रांगणात दुसऱ्या टप्प्यातील भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

         या कार्यक्रमाच्या अध्यक्षा नगराध्यक्षा सौ. पौर्णिमा सयाम, उद्घाटक म्हणून ललित बरछा उपाध्यक्ष तथा बांधकाम सभापती नगर पंचायत धानोरा उपस्थित होते.

            त्याचप्रमाणे प्रमुख अतिथी म्हणून प्रितीश मगरे मुख्याधिकारी नगर पंचायत धानोरा, सौ. देवियानी चौधरी महिला व बालकल्याण सभापती न. पं. धानोरा, स्वरुपा नायकवाडे पोलिस उपनिरीक्षक धानोरा,वैभवी शिरके,पालवी कार्यकर्ते महिला व बाल विकास विभाग गडचिरोली, सौं अल्काताई मशाखेत्री नगरसेविका, कु. सिमा काटेंगे नगरसेविका, सौ. कल्याणी गुरणुले नगरसेविका, सौ. सुषमा भुरसे नगरसेविका, सौ. यामिना पेंदाम नगरसेविका, संजीव कुंडू नगरसेवक, अनिल मशाखेत्री नगरसेवक, भूषण उंदिरवाडे नगरसेवक, सारंग साळवे इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

              यावेळी विविध शासकीय यंत्रणांचे अनेक स्टॉल लावण्यात आले असून, महिलांना विविध योजनांचे लाभ देण्यात आले. त्याचप्रमाणे विविध योजनांच्या लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते लाभाचे वितरण करण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी विविध शाळांच्या विद्यार्थिनींनी सांस्कृतिक कार्यक्रमद्वारे उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी मोठ्या संख्येने शहरातील महिला, विविध शासकीय कार्यालयांचे अधिकारी/कर्मचारी, आरोग्य विभागाचे कर्मचारी, आशा वर्कर, विविध शाळांचे विद्यार्थिनी, विविध शाळांचे शिक्षिका, नगर पंचायत धानोरा सर्व पदाधिकारी, नगरसेवक इत्यादी उपस्थित होते. 

             आज एकीकडे देशात सर्व स्तनांवर महिलांनी आपले नाव लौकीक करत आहेत तरीही बहुतांशी भागांमध्ये महिलांना त्यांच्या हक्काचे स्थान मिळत नाही त्यामुळे अजूनही महिलांना स्वताच्या प्रगतीसाठी आणि उन्नतीसाठी प्रयत्नशील असणे अत्यंत महत्वाचे असून, जोपर्यंत सर्व महिला पूर्णपणे स्वावलंबी बनणार नाही तोपर्यंत देश पूर्णपणे प्रगत होणार नाही असे मत सौ. पौर्णिमा ताई सयाम यांनी अध्यक्ष स्थानावरून बोलताना व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन तसेच आभार प्रदर्शन श्रीमती लक्ष्मी हेडाऊ लिपिक नगरपंचायत धानोरा तसेच विवेक मशाखेत्री यांनी केले. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नगर पंचायत धानोरा चे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.