अनिलकुमार ठवरे
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली..
राजेंद्र रामटेके
ग्रामीण तालुका प्रतिनिधी कुरखेडा
आरमोरी:- आरमोरी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे आढाव बैठक जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.यावेळी कार्यकर्तांना नियुक्त पत्र देण्यात आले.
अन्न व औषध प्रशासन मंत्री महाराष्ट्र राज्य ना.धर्मरावबाबा आत्राम यांच्या मान्यतेने जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया जिल्हाध्यक्षपदी दिपक बैस रा.डोंगरगांव ता.आरमोरी यांची नियुक्ती करण्यात आली.
याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष आरमोरी पदी प्रदीप हजारे,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष महिला आघाडीपदी ऋषालीताई भोयर,राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी शहर अध्यक्षपदी संगिता मेश्राम,राष्ट्रवादी काँग्रेस तालुका सचिव पदी उद्दाराम दिघोरे,राष्ट्रवादी काँग्रेस शहर उपाध्यक्ष पदी प्रफुल्ल राचमलवार,राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका उपाध्यक्षपदी मनोहर दुमाने यांची नियुक्ती करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार, प्रदेशाअध्यक्ष सुनिल तटकरे,अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. धर्मरावबाबा आत्राम,माजी जी. प.अध्यक्षा भाग्यश्री ताई आत्राम,जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर,जिल्हा नियोजन समिती सदस्य नानाभाऊ नाकाडे,प्रदेश संघटक सचिव राष्ट्रवादी काँग्रेस युनुस शेख,राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर,लौकिकभाऊ भिवापूरे उद्योजक तथा नगरसेवक, जिल्हासचिव कपिल बागडे यांनी निवडीबद्दल हार्दिक स्वागत केले.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष दिलीपभाऊ मोटवानी,तालुकाध्यक्ष अमिनभाऊ लालानी,कार्यकारी तालुकाध्यक्ष सुनिल नदंनवार,सामाजिक न्याय विभाग आरमोरी विधानसभा कार्यकारी जिल्हाध्यक्ष देवानंद बोरकर,राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष दिवाकर गराडे,तालुका उपाध्यक्ष राजूभाऊ आकरे,योगेश थोराक,सुनिल ढोरे व डोंगरसावंगी बुथप्रमुख रविभाऊ दुमाने व राष्ट्रवादी कार्यकर्ते उपस्थित होते.