विकसित संकल्प भारत यात्रेचा कोंडेखल येथे मोठ्या उत्साहात कार्यक्रम साजरा.  — संकल्प यात्रेस जिल्हाधिकारी यांची उपस्थिती..

     सुधाकर दुधे

सावली तालुका प्रतिनिधी 

            पंचायत समिती सावली अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत मौजा कोंडेखल येथे आज 30 डिसेंबर रोजी विकसित संकल्प यात्रेचे आगमन झाले.

         सदर कार्यक्रमाच्या अध्यक्ष सौ. सरला कोटांगले सरपंच कोंडेखल या होत्या तर कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून चंद्रपूर जिल्हाधिकारी विनय गौडा हे होते.

              जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी विविध योजनेची माहिती देत उपस्थितांना मोलाचं मार्गदर्शन केले.

           या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून परिक्षीत पाटील तहसीलदार सावली,त्याच प्रमाणे पंचायत समिती सावलीचे गट विकास अधिकारी मधुकर वासनिक,बबन बावनवाडे उपसरपंच कोंडेखल,जिल्हा कृषी अधिकारी ठाकरे,तालुका वैद्यकीय अधिकारी सावली,बाल विकास प्रकल्प अधिकारी सावली,गट शिक्षणाधिकारी सावली,तालुक्यातील विविध अधिकारी,कर्मचारी,तसेच बचत गटाच्या महिला वर्ग तथा ग्रामस्थ उपस्थित होते.

          कार्यक्रमात केंद्र शासनामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजणा बाबत उपसथितांना सविस्तर माहिती देत मार्गदर्शन करण्यात आले.  

          उपस्थित लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत कार्ड,मोदी आवास योजनेचे मंजुरी आदेश,म.ग्रा. रो. ह.योजने अंतर्गत विहरीचे प्रशासकीय आदेश तसेच विविध प्रमाणपत्रे देण्यात आली.

           कार्यक्रमाच्या अनुषंगाने महिला बचत गटांतर्फे विविध स्टॉल लावण्यात आले,आरोग्य विभागाच्या वतीने उपस्थित नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

          सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मधुकर वासनिक गट विकास अधिकारी यांनी केले तर आभार परिक्षीत पाटील तहसीलदार सावली यांनी मानले.