अश्विन बोदेले
जिल्हा प्रतिनीधी
दखल न्यूज भारत
गडचिरोली एसटी महामंडळाने महिलांसाठी अर्धे तिकीट केल्यापासून बस मधून प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या प्रचंड वाढली. याच गर्दिचा फायदा घेत चोरट्यांनी आंबेशिवणी येथे जाणाऱ्या दोन महिलांचे १४ हजार रूपये व एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे पिंपळाचे पदक लंपास केले आहे. सदर घटना २७ डिसेंबर रोजी गडचिरोली बसस्थानकात मौशिखांब बसमध्ये घडली.
येथील लता भैसारे या आपल्या बहिणीसह काही कामानिमित्त आंबेशिवणी येथे जाण्यासाठी निघाल्या होत्या. गडचिरोली आगारात त्या बसमध्ये चढतांना चोरट्यांनी १५ ग्रॅमचे पिंपळाचे पदक वदोन्ही बहिणींच्या पर्समधून १४ हजार रूपये लंपास केले. सदर चोरीबाबत गडचिरोली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.
गडचिरोली आगारात महिलांचे दागीने व पैसे चोरणारी टोळी सक्रीय असल्याचे बोलल्या जात असून गर्दित बसमध्ये चढतांना व उतरतांना महिलांनी विशेष काळजी घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.