कमलसिंह यादव
प्रतिनिधी
पारशिवनी:- हरिहर विद्यालय सावनेर रोड तहसिल कार्यालय समोर येथे आज दिनांक 30/12/2022 रोजी पोलीस स्टेशन पारशिवणी चे वतीने पोलिस निरिक्षक राहुल सोनवणे ठाणेदार पो.स्टे पारशिवणी व पोलीस स्टाफ यांचेसह.
हरिहर महाविद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये समारोपिय कार्यक्रमात सहभाग नोंदवून होऊन
पोलिस निरिक्षक राहुल सोनवने यांनी विद्यार्थीनी याना मार्गदर्शन करतानी येथे कम्युनिटी पोलिसिंग मुहिम अंतर्गत पोलीस काका /दीदी मोहिम राबविण्यात आली असून सदर मोहिमे दरम्यान मुला मुलींना उद्भवणाऱ्या समस्या जाणून त्यावर उपाययोजना बाबत चर्चा तथा मार्गदर्शन केले तसेच महिला अत्याचार, सायबर क्राईम, वाहतुकीचे नियम, पोक्सो, बालविवाह, डायल 112 प्रकल्प आदी विषयांबद्दल बद्दल पोलिस निरिक्षक राहुल सोनवने यांनी उपस्थित पाहुणे पालक व विद्यार्थी या ना मार्गदर्शन करून सर्तक राहण्याचे आव्हान करतानी विशेषतः मुलिना मार्गदर्शन केले.