कमलसिंह यादव
प्रतिनिधी
पारशिवनी :_ पारशिवनी पोलीस स्टेशन हद्दीत आमडी फाटा ते पारशिवनी रोडवर दारु पिऊन जडवाहन चालविणाऱ्या आरोपीस बुधवार दि.२८ डिसेंबर २०२२ चे रात्री ९-३० वाजता दरम्यान अटक केली होती.
ट्रक ड्रायव्हर महेंद्र रामलैडेते सिंग वय २३ वर्षे रा.गगराई कपुरपुर,जिल्हा मैनपुरी (उत्तरप्रदेश) असे आरोपीचे नावे आहे,त्याला आज न्यायालयाने एक महिन्याची सजा सुनावली.
पोलिस सुत्राव्दारे मिळालेल्या माहितीनुसार हकीकत अशाप्रकारे आहे की,ट्रक ड्रायव्हर आरोपी हा घटनेच्या दिवसी दिवसी रात्रो ९.३० वाजताच्या दरम्यान आमडी फाट्यावरून पारशिवनीकडे वाहन क्रमांक एच.आर.५५ एल ३१२० ट्रक घेऊन अति वेगाने इतरांचे जीवित व व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात येईल असे कृत करून वाहन विरुद्ध बाजूने( रॉंग साईडने)चालवीत असल्याची माहिती पारशिवनी पोलिसात मिळाल्यानुसार पारशिवनी येथील शिवाजी चौकात नाकाबंदी केली असता त्यास हात देऊन थांबण्यास सांगितले.
चालकाने ट्रक न थांबता पळून जाण्याचा प्रयत्न केला.तेव्हा पुन्हा तहसील कार्यालया समोर सावनेर रोडवर नाकाबंदी करुन वाहन थांबण्यात आले.
ड्रायव्हरला विचारले असता त्यांनी दारू पिऊन असल्याचे कबूल केले.वाहन पोलीस स्टेशनला नेऊन याबाबत दारू पिऊन आहे की काय ? याबाबत वैद्यकिय अधिकारी ग्रामीण रुग्णालय पारशिवनी यांच्याकडून अभिप्राय घेतला असता त्यांनी दारूच्या अंमलाखाली असल्याचा अभिप्राय दिला.
त्यानुसार आरोपी चालका विरुद्ध भादवीचे कलम २७९,३३६ सह मोवाका कलम १८५, ४/१२२, १७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
पारशिवनी न्यायालय येथे न्यायासाठी पोलीस उपनिरीक्षक ज्ञानबा पळनाटे यांनी आरोपत्रासह गुरुवारी दुपारी २९ डिसेंबर रोजी स्थानिक न्यायालयात हजर केले असता, त्यास पारशिवनी येथील न्यायमूर्तींनी आरोपी ट्रक ड्रायव्हर महेंद्र रामलैडेते सिंग वय २३ वर्षे रा.गगराई कपुरपुर,जिल्हा मैनपुरी (उत्तरप्रदेश) असे आरोपी यांना एका महिण्याची सजा सुनवली व आरोपीस जेल मध्ये रवाना केले.