भैय्यालाल रामटेके
कोटगाव
तह.चिमूर..
लोकशाहीर अलंकार टेंभुर्णे म्हणजे कर्तव्यदक्ष मनाचे जागरूक व्यक्तीमत्व.त्यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून व विदर्भ शाहीर कलाकार परिषद कन्हानच्या माध्यमातून अनेक क्षेत्रातील लोकशाहीर कलावंतांना आणि लोक प्रबोधन कलावंतांना न्याय देण्यासाठी अथक परिश्रम घेतले.
याचबरोबर शासकीय स्तरावरून लोक कलाकारांना दरमहा भरीव आर्थिक सानुग्रह मदत मिळावी म्हणून शासन-प्रशासन दरबारात त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या सहकार्याने लेखी मागणी रेटून धरली व लोकशाहीर कलावंतांचा आणि इतर क्षेत्रातील कलावंतांचा उपेक्षित प्रश्न निकाली काढण्यासाठी कर्तव्यातंर्गत दक्षता पणाला लावली.
मनमिळाऊ व स्वयंमी स्वभाव असलेले गुणविशेष अलंकार टेंभुर्णे भाऊ यांचा लोककला सेवा मंडळ,(आॅल इंडिया) यांच्या द्वारा,”लोकशाहीर भाऊराव भाऊ पांडुरंग उमाजी घुले जिवन गौरव पुरस्कारान्वये,२ जानेवारी रोजी गौरव होतो आहे.
लोकशाहीर तथा विदर्भ शाहीर कलाकार परिषद कन्हानचे सचिव अलंकार टेंभुर्णे यांचा लोककला सेवा मंडळ आॅल इंडिया द्वारा होणारा गौरव म्हणजे महाराष्ट्र राज्यातील लोक कलाकारांची अभेद्य उर्जेचा गौरव आहे असे म्हणणे अनुचित ठरणारे नाही.
लोकशाहीर अलंकार टेंभुर्णे हे महाराष्ट्र राज्यातील लोक कलाकारांचे आधारस्तंभ बनून उभ्या आयुष्यात यशस्वी ठरावेत या मंगल कामनांसह त्यांच्या होणाऱ्या जिवन गौरवास माझ्यासह महाराष्ट्र राज्यातील लोक कलाकारांच्या वतीने त्यांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!