बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहपुर प्रतिनिधी
जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्यानिकेतन कॉलेज ऑफ फार्मसी लाखेवाडी च्या विद्यार्थिनींची राष्ट्रीय स्तरावर थ्रो बॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
दि. ८ ते ११ नोव्हेंबर २०२४ दरम्यान “बिजनोर महोत्सव” विवेक युनिवर्सिटी, बिजनोर – उत्तर प्रदेश या ठिकाणी पार पडलेल्या ४५ व्या राष्ट्रीय थ्रो बॉल चॅम्पियनशिप २०२४ स्पर्धेमध्ये विद्यानिकेतन कॉलेज ऑफ फार्मसी लाखेवाडीच्या कु. प्रतिक्षा बाबर, कु. मोनल पांडुळे, कु. अश्विनी कासवेद, कु. क्रांति मारकड या विद्यार्थिनींची महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करत राष्ट्रीय थ्रो बॉल संघात निवड झाली आहे. या विद्यार्थिनी पुढील काळात नॅशनल थ्रो बॉल वुमेन्स संघाकडून खेळणार आहे. थ्रो बॉल फेडरेशन ऑफ इंडिया यांचेकडून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
संस्थेचे अध्यक्ष श्री. श्रीमंत ढोले सर, उपाध्यक्षा सौ.चित्रलेखा ढोले मॅडम, सचिव श्री. हर्षवर्धन खाडे, मुख्य सल्लागार श्री.प्रदीप गुरव साहेब व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सम्राट खेडकर सर यांनी निवड झालेल्या खेळाडूंचे, क्रीडा शिक्षक श्री. तलवारे सर आणि संघ व्यवस्थापक श्री. बोरकर सर यांचे हार्दिक अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.