देशातील सर्वच महापुरुषांनी ( देवांनी नव्हे ) आमच्या कल्याणासाठीच त्याग, संघर्ष आणि समर्पणातून क्रांतीला स्वतःपासून सुरुवात केली. त्या क्रांतीला शह देण्यासाठी कुटनीतीच्या शक्तीने आपली सर्वतोपरी शक्ती ( साम, दाम, दंड आणि भेदाची शक्ती ) पणाला लावून प्रतीक्रांतीने अणुबॉम्बसारखा स्फ़ोट घडवून आणण्यासाठी कोरोनाच्या गतीने काम करुन अंतिम टप्प्यात येऊन क्रांतीला शह देण्याचा शेवटचा घणाघात महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत EVM वर घोटाळे करुन तिसऱ्यांदा सरकार स्थापन करुन घातला…..!
परंतू ,आमच्या महापुरुषांनी विवेकाच्या मार्गाने या कूटनितीला शह देण्यासाठी नव्हे तर कायमचे मातीत गाडून जगाच्या वेशिवर टांगण्यासाठी आम्हाला त्यांनी त्यांच्या क्रांतीतून ऊर्जा निर्माण केली. त्या हायड्रोजन बॉम्बच्या विवेकाच्या ऊर्जेतून प्रतीक्रांतीला शह देण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे.
ती वेळ म्हणजे…….
सहा डिसेम्बर 2024 शुक्रवारी
ज्या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 68 वर्षांपूर्वी महापरीनिर्वाण झाले. त्याच दिवशी आपण ज्या शहरांत, गावात राहता. तालुक्याच्या ठिकाणी राहता. त्या संबंधित प्रशासकीय अधिकारी मग ते तहसीलदार असतील, जिल्हाधिकारी असतील, विभागीय आयुक्त असतील त्या त्या संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर आपल्या मागणीचे निवेदन देण्यासाठी, सहा डिसेम्बर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करुन मोर्चाच्या रूपाने निवेदन देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात त्या एकाच दिवशी या महामोर्चाचे आयोजन करावे…..
त्यासाठी आपल्या शहरातील महाविकास आघाडीच्या राजकीय पक्षांना, इतर स्वतंत्र राजकीय पक्षांना, अपक्ष असलेल्या उमेदवार यांना सुद्धा आवाहन करुन आपल्या मोर्चात सामील करुन घेऊन महामोर्चाचे आयोजन करावे…..
मागणी एकच की, झालेल्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका EVM वर घोटाळे करुन झालेल्या आहेत. आणि आमच्या मताच्या अधिकाराचे हणन झाले आहे. त्यासाठी मतपत्रिकेवर ( बॅलेट पेपरवर ) पुन्हा नव्याने निवडणुका मुख्य निवडणूक आयोगाने घ्याव्यात. याच मागणीसाठी या महामोर्चाचे आयोजन करावे…..
मी औरंगाबादची जबाबदारी घेतली आपण सर्वांनी आपापल्या शहरांची जबाबदारी घ्यावी…..
त्यासाठी आपण ज्या ग्रुपवर आहात त्या ग्रुपवर आणि शक्य असेल तर आपल्या मो. नंबर वर सुद्धा शक्य असेल तेवढ्या माझ्या नंबर वरून मागणीचे निवेदन या पोस्ट सोबतच पाठवलेले आहे…..
त्या निवेदनातील मुख्य मागणीचा सार घेऊन आपल्या शहरातील ठिकाणाप्रमाणे आपण नियोजन करावे. त्यासाठी संबंधित पोलीस स्टेशनला निवेदन देऊन महामोर्चाचे नियोजन करावे…..
काही अडचण आल्यास माझ्या मो.वर संपर्क करावा.
केवळ सहा डिसेंबर याच दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात हे नियोजन करुन महामोर्चा काढावा……!