वाशिम प्रतिनिधी/आशिष धोंगडे
वाशिम:- युवा अनुभव शिक्षा केंद्र अमरावती वाशिम अंतर्गत दि. २८/११/२०२२ रोजी ग्रामपंचायत पाटोदा या ठिकाणी युवक अभ्यास दौरा घेण्यात आला.यामध्ये अमरावती आणि वाशिम जिल्ह्यातील अनुभव साथी या युवक अभ्यास दौरा मध्ये उपस्थित होते.सर्वप्रथम पाटोदा या ठिकाणी जाऊन ग्रामपंचायतची पाहणी करण्यात आली.त्यामध्ये सर्वप्रथम जिल्हा परिषद शाळेमध्ये राष्ट्रगीत सुरू असताना ग्रामस्थांचा आदरपूर्व पाहायला मिळालं.आणि गावाच्या प्रवेश द्वाराव वरती ग्रामस्थांच्या जन्मदिवसाच्या एलईडी,च्या माध्यमातून प्रत्येक नागरिकांचा जन्मदिवस स्क्रीनवर दाखवून साजरा केला जातो.या स्क्रीन च महत्व म्हणजे गावामध्ये कुठल्याही प्रकारे बॅनरबाजी किंवा बॅनर बंदी हा निर्णय पाटोदा ग्रामपंचायत यांनी घेतला.त्यानंतर ग्रामपंचायत पाटोदा येथे अमरावती व वाशिम येथील युवकांनी प्रदर्शनी करण्यात आली.
त्यामध्ये डेव्हलप केलेली ग्रामपंचायत व ग्रामपंचायत मध्ये दिलेल्या सुविधा याबाबत प्रत्येक नागरिकांकडून वार्षिक ४००० हजार रुपये टॅक्स गोळा करून प्रत्येक नागरिकांना विविध अशा सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामध्ये ग्रामस्थांना आरोचे पाणी, गिरणी,तेल घाला, गरम पाणी थंड पाण्याचे नियोजन,चौकात चौका मध्ये बेसिन,गावकऱ्यांकडून १५ रुपयांमध्ये प्लास्टिक विकत घेऊन प्लास्टिक बंदी निर्णय गावकऱ्यांनी घेतला,शेतीला लागणारे साहित्य जसे की ट्रॅक्टर हे सुद्धा टॅक्स च्या माध्यमातून फ्री, या सोयी सुविधा ग्रामपंचायत यांनी ग्रामपंचायत कर भरल्या नंतर ह्या गोष्टी नागरिकांना पुरविल्या जातात. आणि गावकऱ्यांचा कर 2023 पर्यंत ग्रामपंचायत यांच्याकडे भरलेला दिसून आला आहे. त्यानंतर ग्रामपंचायत येथील ऑपरेटर तसेच रोजगार सेवक यांनी गाव पाहणी करण्याकरिता घेऊन गावाचा विकास याबाबत पाहणी करण्यात आली.त्यामध्ये सर्वप्रथम गावाच्या प्रत्येक चौकांमध्ये अपघात होऊ नये म्हणून मिरल, सीसीटीव्हीच्या माध्यमातून गावाला लक्ष केंद्रित करण्याचे काम व होणारे परिणाम टाळण्यासाठी याचा वापर सुरू ग्रामस्थांनी केला आहे.पाटोदा येथील जिल्हा परिषद शाळा याला भेट देऊन शाळा एक निसर्गाने रम्य वातावरण असणारी शाळा आम्हाला पाहायला मिळाली.व शाळा खूप डिझायनिंग आणि सीसीटीव्ही च्या माध्यमातून ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कडे केंद्रित करण्यात आले.गावातील स्मशानभूमी असेल व गावामधल्या सोयी सुविधा आणि सुरळीत रस्ते,आम्हाला पाहिला मिळालं गावामध्ये वाचनालय असेल व्यायाम शाळा असेल अशा विविध उपक्रमांमधून युवकांना तयार करण्यासाठी पाटोदा ग्रामपंचायत युवकांमध्ये काम करत होताना दिसत आहे.कुठल्याच प्रकारे व्यसनाधीनता आढळून आली नाही.शिस्त पद्धतीने प्रत्येक नागरिक आम्हाला पाहायला मिळाले आहे. त्यानंतर ग्रामपंचायतच्या योगदानासाठी त्यांनी परिश्रम घेतले मा.भास्कर पेरे पाटील त्यांच्यासोबत आम्हाला चर्चा घडवून आली त्यामध्ये प्रत्येक नागरिकांनी भास्कर पेरे पाटील यांना प्रश्नाच्या माध्यमातून गाव विकास कराच्या आराखडा आणि ७ शिक्षण घेतलेला व्यक्तीने अशा विविध राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त पाटोदा ग्रामपंचायत डेव्हलप कशाप्रकारे संकल्पना आली. हे त्यांच्या वाणीतून आम्हाला ऐकायला मिळालं व खूप अशा प्रश्नाच्या माध्यमातून साहेबांसोबत चर्चा करण्यात आली. त्यांना अनुभव शिक्षा केंद्राच्या प्रक्रिये संदर्भात माहिती देण्यात आली ज्या माध्यमातून आम्ही युवकांनी अभ्यास दौरा काढला व त्यामागचा हेतू आणि गावांमधून ईमेल आलेल्या मार्गदर्शन हे युवकांनी आत्मसात करण्यात आले. त्यानंतर प्रत्येक युवकांनी जेवणाचा आस्वाद घेऊन कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्याकडे वळण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये प्रत्येक युवकांनी आपले मत आणि प्रत्येक युवकांकडून फीडबॅक घेण्यात आला. त्यानंतर आम्ही सिद्धार्थ गार्डन औरंगाबाद येथे प्राणी संग्रहालय यांची पाहणी करायला निघालो त्यामध्ये सिद्धार्थ गार्डन येथे युवकांसोबत खेळ मस्ती गाणे च्या माध्यमातून अनुभव शिक्षकेंद्र प्रक्रिया आणखी इतर युवकरण करत पोहोचावी या संदर्भामध्ये युवकांसोबत चर्चासत्र घेण्यात आलं व प्रत्येक युवकांनी अनुभव शिक्षा केंद्राचं आभार मानलं या आभाराचे वैशिष्ट्य म्हणजे की या युवकांना मिळालेली अभ्यास दौऱ्याच्या माध्यमातून शिकायला मिळालेली शिकवण या शिक्षणाच्या माध्यमातून त्याचप्रमाणे या युवक अभ्यास दौऱ्याचे नियोजन अनुभव शिक्षा केंद्रा चे अमरावती वाशिम जिल्हा प्रशिक्षक आशिष धोंगडे यांनी केले होते. अशाप्रकारे ही अनुभव शिक्षा केंद्रा अमरावती वाशीम अंतर्गत युवक अभ्यास दौरा पाटोदा येथे संपन्न झाला…….
आशिष धोंगडे
वाशिम प्रतिनिधी
दखल न्युज भारत