नीरा नरसिंहपुर दिनांक: 30
प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार,
इंदापूर तालुक्यात ग्रामीण भागातील भाविकांनी नामस्मरणाचे चिंतन करून परमार्थाची गोडी आसने गरजेचे. थोर भाविकांनसाठी मान सन्मान आणि आपुलकीची भावना नेहमीच आसावी,
टणु (ता.इंदापूर) येथील कैलासवासी ज्ञानोबा कृष्णात माने-देशमुख यांच्या प्रथम पुण्य स्मरणार्थ किर्तन सेवेत ह- भ-प सागर महाराज बोराटे बोलत होते.यावेळी टणु, नरसिंहपुर, पिंपरी बुद्रुक, गिरवी, गणेशवाडी, सराटी, बावडा, अकलूज, टेंभुर्णी, शंकरनगर,आदी ग्रामस्थ भाविक भक्त मोठ्या संख्येने सर्व भागातून उपस्थित होते.
सागर बोराटे महाराज पुढे किर्तन सेवा रूपी म्हणाले की हाताने टाळी मुखाने देवाचे भजन आणि नामस्मरण करणे हीच काळाची गरज आहे.
तरच आपल्या जीवनाला सुख आणि समृद्धी प्राप्त होईल.
तरुण पिढीने लवकरच परमार्थाचा मार्ग धरावा आजूनही वेळ गेलेली नाही. तारुण पनात धार्मिक क्षेत्राची गोडी लागली तर पुढच्या पिढीला देखील चांगल्या वळणाचा मार्ग मिळाल्या शिवाय राहणार नाही. कीर्तन सेवा करीत आसताना ह -भ -प सागर बोराटे महाराज सांगत होते.