युवराज डोंगरे/खल्लार
दर्यापूरचे तहसिलदार यांनी राजकीय दबावाखाली येऊन मूळ गावतलावात जाणाऱ्या पाण्याचा प्रवाह बदलून शेतातील उभ्या पिकांत नाली करुन शेतातील उभ्या पिकाचे नुकसान करुन पिकांचे झालेले नुकसान भरपाई करुन देण्यात यावी अशी मागणी दर्यापूर तालुक्यातील म्हैसपूर येथील शेतकऱ्याने अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
दर्यापूरचे तहसिलदार डॉ योगेश देशमुख,रामतीर्थचे मंडळ अधिकारी दिनेश केवाडे,येवदयाचे मंडळ अधिकारी सचिन राठोड,लोतवाडा तलाठी सैलेंद्र चक्र नारायण, कृषि सहाय्यक राजेश बेलोकार यांनी दि 14 नोव्हेंबरला म्हैसपूर येथील शेतकरी संजय गोविंदराव ठाकरे यांना एकाच नोटीस अन्वये संजय ठाकरे यांच्या शेतात जेसीपी क्रमांक ए एच 27,बि व्ही 8692 ने सर्वे नंबर 1मध्ये संजय ठाकरे व भरत ठाकरे यांचे धुऱ्यावर पूर्व पश्चिम 3 फूट खोल व 2 फूट लांब नाली केली आहे. त्यामुळे संजय ठाकरे व भरत ठाकरे यांचे शेतातली उभ्या पिकाचे 2 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
याबाबत संजय ठाकरे यांनी दर्यापूरचे तहसिलदार व तलाठी यांना सध्या नाली करु नका शेतातील उभ्या पिकांचे नुकसान होईल शेतातील पिक काढल्यानंतर एप्रिल, मे महिन्यात नाली करा असे सांगितले मात्र तहसिलदार डॉ योगेश देशमुख यांनी संजय ठाकरे यांचे म्हणणे विचारात घेतले नाही. नुकसानभरपाई मिळून जाईल असे सांगितले. मात्र शेतमालक संजय ठाकरे यांनानुकसानभरपाई मिळाली नाही.
स.न.104चे पाणी पूर्वी स. न104च्या पश्चिम धुऱ्याच्या बाजूला असलेल्या गाव तलावात 75%पाणी जात होते तर 25%पाणी हे स. न1मधुन शेतातून जात होते.
दर्यापूरचे तहसिलदार यांनी तक्रारदार श्रीकांत ठाकरे व राजकीय पुढारी यांच्या दबावात येऊन मूळ गावतलावात जाणाऱ्या पाण्याचा प्रवाह बदलून संजय ठाकरे यांचे शेतातून नाली करुन उभ्या पिकाचे नुकसान करुन राजकीय हेतूपायी नियम बाह्य काम केले असल्याचा आरोप संजय ठाकरे यांनी केला असून दर्यापूरचे तहसिलदार डॉ योगेश देशमुख यांनी पाण्याचा मूळ मार्ग कोणत्या नियमखाली बदलला?