उमेश कांबळे ता प्र भद्रावती –
डॉ. आंबेडकर मेमोरियल हायस्कूल येथे संविधान दिनाचे औचित्य साधून ७ दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या सविंधान सप्ताह कार्यक्रमाचे उदघाटन ठाणेदार गोपाल भारती यांच्या हस्ते करण्यात आले. सतत चाललेल्या या ७ दिवसाच्या कार्यक्रमात भद्रावतीच्या मुख्य रस्त्यावरुण विद्यार्थ्यांनी रॅली काढून संविधानावर जनजागृती करण्यात आली. समाज जागृतीसाठी विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले, महापुरुषांची वेशभूषा सादरीकरण करण्यात आले, गीत गायन स्पर्धा, मान्यवरांचे व्याख्यान इत्यादी कार्यक्रम संविधान सप्ताह निमित्त सादर करण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमात इयत्ता ४ ते १० वी च्या विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शिवला. अखेर समारोपीय कार्यक्रमात मुख्याध्यापक मिलिंद वाघमारे, प्रिया नागदेवते , पल्लवी चौधरी, रेश्मा मालखेडे यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमास संदीप पोटे, प्रशांत सातपुते, विनोद ठमके आदी शिक्षक गण व विद्यार्थी पालक यांचा सहभाग होता.