ऋषी सहारे /प्रितम जनबंधु
संपादक
दखल न्युज भारत
आरमोरी:- प्राप्त माहितीनुसार आरमोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज काळबांडे यांचे मार्गदर्शनात आरमोरी पोलीस स्टेशन च्या वतीने गुप्त माहितीचा आधार घेत वैरागड ठानेगाव परीसरात सापडा रचून दोन मोठ्या दिग्गज मजातस्कराना अटक करून कारवाई करण्यात आली असुन चंद्रपूर ला रवानगी करण्यात आली आहे. यामधे सलीम माखाणी अंदाजे वय 40 वर्ष मु. वैरागड तसेच गंगाधर चीचघरे अंदाजे वय 36 वर्ष मु. ठाणेगाव असी अटक तस्कराची नावे आहेत.
आरमोरी तालुक्यात अनेक दिवसांपासून मजा तस्करानी धुमाकूळ घातला होता. वैरागड ठाणेगाव परीसरातुनच सदर मजातस्कर तस्करीचे सूत्र राजरोसपणे चालवीत असत. झालेल्या कडक व धडक कारवाईत मजा विक्रेत्यांमधे दहशत निर्माण झालेली दिसुन येत आहे. पुढील तपास आरमोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज काळबांडे यांचे मार्गदर्शनात सुरु आहे.