आळंदीत पवार साहेबांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील नेते उपस्थित…

दिनेश कुऱ्हाडे

उपसंपादक

आळंदी : आळंदी येथील ग्रामदैवत हजेरी मारुती मंदिराच्या सभामंडपाच्या दगडी कामांचा शुभारंभ करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज आळंदीत आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पडल्यानंतर ते प्रथमच आळंदीत आले होते. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी आळंदी शहरातील राष्ट्रवादीचे दोन्ही गटातील नेते आवर्जून उपस्थित होते. पण तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी मात्र या कार्यक्रमाला येणे टाळले.

           यावेळी माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर पाटील यांच्या हस्ते शरद पवार यांना चांदीची गदा देऊन आळंदीकर ग्रामस्थांच्या वतीने गौरविण्यात आले. याप्रसंगी खासदार श्रीनिवास पाटील, माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे, माजी नगरसेवक डि.डि.भोसले, प्रशांत कुऱ्हाडे, वासुदेव घुंडरे, श्रीधर कुऱ्हाडे, सागर बोरुंदीया, दिलीप कुऱ्हाडे, सचिन गिलबिले, प्रकाश कुऱ्हाडे, दिनेश घुले, मृदुल भोसले, आनंदराव मुंगसे, बाबूलाल घुंडरे, सुनील रानवडे, नितिन साळुंके, चेतन कुऱ्हाडे, उमेश रानवडे, संतोष भोसले, नंदकुमार वडगावकर, अनिकेत कुऱ्हाडे, विशाल वहीले, प्रियेश रानवडे, सागर कुऱ्हाडे, सतीषबापू कुऱ्हाडे, सौरभ गव्हाणे, निसार सय्यद तसेच आळंदीकर ग्रामस्थ बहूसंख्येने उपस्थित होते. शरद पवार यांनी संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीचे दर्शन घेतले यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने विश्वस्त विकास ढगे पाटील यांनी त्यांचे स्वागत केले यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, पीडीसी बॅंकेचे माजी अध्यक्ष प्रकाश म्हस्के, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हिरामण सातकर, राजाभाऊ चोपदार, ज्ञानेश्वर वीर उपस्थित होते.