चेतक हत्तीमारे
जिल्हा प्रतिनिधी
साकोली :- संजीवनी नर्सिंग कॉलेज साकोली येथे बार्टी च्या वतीने विविध कार्यक्रम घेण्यात आले.
सर्वप्रथम महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यारपन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. डॉ.निलेश नाफडे संचालक संजीवनी नर्सिंग कॉलेज साकोली, प्रमुख अतिथी मा. उद्धव निखारे, कु. प्रज्ञा दिरबुडे समतादूत बार्टी, मा. डॉ. पल्लवी नाफडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
विद्यार्थिनी द्वारे रांगोळी स्पर्धा, भाषण स्पर्धा, गितगायन स्पर्धा राबविली गेली. रांगोळी स्पर्धेत भाग्यश्री ठाकरे, नीलम भालेकर, त्रिवेणी नारनवरे यांनी प्रथम द्वितीय व तृतीय पारितोषिक मिळविले.निबंध स्पर्धेत पूजा कोडपे, वायंका पंधरे यांना प्रथम व द्वितीय क्रमांक मिळाले. गितगायनात पल्लवी नगरिकर व वकृत्व स्पर्धेत ऐश्वर्या मेश्राम यांनी क्रमांक पटकाविले.
उद्धव निखारे यांनी आपल्या मार्गदर्शनात संविधानाची उपयुक्तता व नागरिकांचे मूलभूत हक्क यावर प्रकाश टाकला. प्रज्ञा दिरबुडे यांनी संविधानातील आवश्यक तरतुदी व मूलभूत कर्तव्य यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमात संविधानाची प्रस्तावनेचे सामूहिक वाचन घेण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्राचार्य दामिनी गोहाने, चेतना मेश्राम,अश्विनी मठामे, लिना खोब्रागडे, पतिराम भेंडारकर, गणेश मेश्राम, दुर्गा हटवादे, नलिनी कापगते ई. कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले.