चेतक हत्तीमारे
जिल्हा प्रतिनिधी
साकोली:- साकोली येथील प्रभाग क्रमांक 5,6 येथील रस्तासिमेंटकरन मध्ये सिमेंट सोबत मातीचे मिश्रण करून रस्ता बनवण्यास सुरुवात झाली असून रस्ता सुकल्यावर मातीचे कण रस्त्यावर दिसत असल्यामुळे नगरपरिषदेचा सीमेंटीकरणामध्ये भोंगळ कारभार झाल्याचे दिसून आले आहे.
रमेश बावणे ते गडकुंभली रोड पर्यंत रस्त्याचे सिमेंटकरण सुरू असून सिमेंट कमी व जास्त रेती मिक्सर करून रस्त्यावर घालत असल्याचे दिसून आले. रस्ता सिमेंटीकरन काम हे ठरावा नुसार नसल्याने नागरिकांनी असंतोष दर्शवून सदर सिमेंटकाँक्रीटकरनाला नागरिकांनी विरोध दर्शविला असून सदर कंत्राट दारावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असून नगरपरिषदेविरुद्ध एल्गार पुकारला आहे.
प्रतिक्रिया:- 1) रेवाजी गजापुरे
सिमेंटमध्ये रेती ऐवजी माती घालून भोंगळ कारभार करत आहे.सदर कामाची चौकशी करण्यात यावी.
2) बाबुराव पेंदाम
पूर्ण रस्ता हा पैसेखाऊ असून सदर ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करावा.