युवराज डोंगरे/खल्लार
दर्यापूर येथून मुर्तीजापुर कडे जाणाऱ्या रोडच्या कडेला पेविंग ब्लॉक न बसवता आणि रोडच्या आजूबाजूच्या नाली चे काम न करता सार्वजनिक बांधकाम विभागाने रोडचे काम बंद केले होते, हे जेव्हा युवासेना उपजिल्हाप्रमुख अंकुश पाटील कावडकर यांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी सदर प्रकरणात हात घातला आणि सार्वजनिक बांधकाम विभाग मुख्य अभियंता अमरावती यांना निवेदन देऊन धारेवर धरले..
या निवेदनात त्यांनी म्हटले की वरील रस्ता हा दर्यापूर वरून मुर्तीजापुर कडे जाणारा मुख्य रस्ता असून हा अमरावती-अकोला दोन जिल्ह्यांना जोडणारा रस्ता आहे, हा रस्ता दर्यापूर शहर मधून जातो. या रस्त्याचे आजूबाजूला पेव्हिंग ब्लॉक हे अतिशय निकृष्ट दर्जाचे किंबहुना कुठे कुठे बसविलेलेच नाही आहे आणि रोडच्या कडेला असलेल्या नालीचे काम पूर्णतः अपूर्ण आहे आणि यामध्ये भ्रष्टाचार झालेला दिसून येत आहे. सादर निवेदनाची दखल न घेतल्यास आम्ही युवासेना स्टाईलने आंदोलन करू असे सुद्धा या निवेदनात म्हटले आहे. तरी या निवेदनाची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभाग मुख्य अभियंता अमरावती यांनी कार्यकारी अभियंता दर्यापूर यांना तात्काळ पत्र देऊन संबंधित झालेल्या भ्रष्टाचारावर कार्यवाही करण्यास सांगितले तसेच कार्यकारी अभियंता दर्यापूर यांनी सुद्धा या पत्राची दखल घेत राहिलेले काम तात्काळ पूर्ण करण्यास सुरुवात केलेली आहे.
या वेळी निवेदन देते वेळी युवासेना उपजिल्हा प्रमुख अंकुश पाटील कावडकर, युवासेना अमरावती शहर प्रमुख शुभम जवंजाळ, प्रणय मेहरे, वासुदेव अवसरे,जतिन बसिन, आतिश वाघमारे,संतोष तिरमारे तसेच शिवसैनिक युवसैनिक उपस्थित होते.