देशाची राष्ट्रीय एकता आणि एकात्मता अखंड कायम टिकविण्यासाठी माझे नैतिक आणि घटनात्मक कर्तव्य..

          “आम्हाला ( भारतीय सर्वसामान्य जनतेला ) राष्ट्रीय एकता आणि एकात्मता अखंड टिकवायची असेल……..

        तर या कूटनितीच्या सर्वच राजकीय पक्षांच्या राजकीय नेत्यांना म्हणजेच राजकारण्यांना राजकीय सिंद्धांतावरच वठणीवर आणावे लागेल.

       या सनदी आणि अधिकारी,कर्मचारी वर्गाला सुद्धा नैतिकतेवर जगण्यासाठी भाग पाडावे लागेल.

        या नीतीभ्रष्ट न्यायव्यवस्थेला विवेकातून न्याय देण्यासाठी भाग पाडावे लागेल.

       शिक्षक,प्राध्यापक,डॉक्टर्स यांना सुद्धा यांच्या नैतिक कर्तव्याची जाणीव करुन द्यावीच लागेल.

         आमदार,खासदार आणि नामदार यांना सुद्धा त्यांनी संसदेत आणि विधानमंडळात केलेल्या कामाचा जाब विचारावा लागणारच आहे.

          पत्रकारितेला सुद्धा षंढ आणि नपुसंकतेतुन गचांडी पकडून बाहेर काढण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे.

         अख्ख आभाळ फाटलेलं असतांना, धरणच फुटलेलं असतांना ठीगळ लावणाऱ्या, बांध घालणाऱ्या बंगल्यात राहून झोपडीचं वर्णन करणाऱ्या साहित्यिकांना ( कवी, लेखक) त्यांच्या लेखणीतून हायड्रोजन बॉम्ब बाहेर पाडण्यासाठी भाग पाडावे लागणार.

        सर्वसामान्य जनतेला राजकारण आणि जाती धर्माच्या पलीकडे जाऊन कुटनीतीच्या अतिक्रमणातून विवेकाच्या मार्गांवर आणण्यासाठी प्रयत्न करावे लागणार अशी सर्वप्रकारची नैतिक जबाबदारी सर्वाना पार पाडावी लागणार आहे….

      कारण येत्या 26 नोव्हेंबर 2024 आणि 26 जानेवारी 2025 रोजी संविधान दिनाला व प्रजासत्ताक दिनाला 75 वर्षे पूर्ण होऊन अमृत महोत्सवी वर्षे संपून 76 व्या वर्षात पदार्पण करत आहोत……

तर मग ही जबाबदारी कोण पार पाडणार?

      ही नैतिक आणि घटनात्मक जबाबदारी आणि कर्तव्य ” मी ” पार पाडणार…..

       कारण ” मी ” संविधानातील उद्देशीकेप्रमाणे वरील घटनात्मक आणि नैतिक कर्तव्य हे स्वतःप्रत अधिनियमित आणि अंगीकृत केले आहे!

म्हणून मी मांजरीच्या गळ्यात त्याग,संघर्ष आणि समर्पनातून घंटा बांधणार आहे…… 

    केवळ आणि केवळ…..

देशाची राष्ट्रीय एकता आणि एकात्मता अखंड कायम टिकविण्यासाठीच…..

     केवळ लेखकच नव्हे जबाबदारी व कृतीतून कुटनीतीचे आव्हाने स्वीकारणारे अनंत भवरे आहे..

       अनंत केरबाजी भवरे

    संविधान विश्लेषक,औरंगाबाद, रेणापूरकर, 7875452689…