ऋग्वेद येवले
नागपूर विभागीय प्रतिनिधी
साकोली:परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूरच्या वतीने चर्चासत्र स्थळ,साकोली येथे दिनांक 29 ऑक्टोबर 2023 रोज रविवारला परमात्मा एक सेवकांची कोजागिरी उत्साहात साजरी करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीपप्रज्वलन करून भगवान बाबा हनुमानजी, महानत्यागी बाबा जुमदेवजी, तसेच मातोश्री वाराणसी आई यांच्या प्रतिमेचे पूजन करून स्वागत करण्यात आले.
कोजागिरी कार्यक्रम निमित्ताने अंधश्रद्धा निर्मूलन, वाईट व्यसनमुक्ती, बाबांनी दिलेले तत्व,शब्द, नियम, मर्यादित कुटुंब आणि एकतेचे महत्त्व हे विषय घेऊन चर्चा बैठकीचे आयोजन करण्यात आले. या नियोजित चर्चा बैठकीचे अध्यक्ष श्री रामलालजी रुखमोडे (मार्गदर्शक साकोली) तसेच प्रमुख अतिथी म्हणून श्री देवराम तुमसरे (मार्गदर्शक साकोली),एम.पी.गुरुबेले सर, माणिकरामजी निखारे सर ,आनंदजी सोनवाणे, दिगांबरजी दिघोरे बोदरा, शेषरावजी भानारकर कुंभली, सुरेशजी वलथरे व इतर जेष्ठ सेवक व मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
या कोजागिरीच्या कार्यक्रमाला साकोली व परिसरातील अनेक गावांमधील बाबांचे सेवक हजारोच्या संख्येने उपस्थित होते.
कोजागिरीचे औचित्य साधून साकोली व साकोली परिसरातील वर्ग 10 वी व 12 वी च्या परीक्षेमध्ये प्राविण्यप्राप्त अनेक विद्यार्थ्यांचा मानचिन्ह व मेडल देऊन सत्कार करण्यात आले. सत्कार स्वीकारताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वासाचा आनंद दिसून आले.
बाबांच्या कार्यक्रमासाठी सदैव सहकार्य करणारे ज्येष्ठ सेवक चर्चासत्र स्थळ देखरेख समितीचे अध्यक्ष सुरेशजी वलथरे हे नुकतेच शासकीय नोकरी मधून नियत वयोमानाने सेवानिवृत्त झाले त्याप्रित्यर्थ त्यांचा सपत्नीक शाल, श्रीफळ व साडीचोळी देऊन सत्कार करण्यात आले.
तसेच साकोली व साकोली परिसरातील सेवकांच्या मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे माध्यमातून आपल्यामध्ये असलेल्या कलागुणांचा नृत्यांच्या, गीतांच्या माध्यमातून उत्कृष्ट प्रदर्शन केला.
कार्यक्रमांमध्ये भाग घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा, महिलांचा व पुरुषांचा आयोजकांच्या वतीने बक्षीस वितरित करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन चर्चासत्र स्थळ देखरेख समितीचे सचिव बाबुरावजी मेश्राम यांनी तर आभार प्रदर्शन धनंजय तुमसरे यांनी केले.
कार्यक्रमाचे यशस्वीतेकरिता चर्चासत्र स्थळ देखरेख समितीचे सर्व संचालक मंडळ तसेच साकोली मधील सर्व बाबांचे सेवक, सेविका यांनी सहकार्य केले.
कार्यक्रमाचे समारोप सर्वांनी भोजन करून दूध वाटप करण्यात आले.