
रामदास ठुसे
विशेष विभागीय प्रतिनिधी
चिमूर:-
स्थानिक आमदार विकास निधी कार्यक्रमांतर्गत चिमूर नगर परिषदेच्या वतीने दोन दिवसीय विविध सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन नेहरु विद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले.
दिनांक 31 ऑक्टोंबर ते 1 नोव्हेंबरला सायंकाळी 7 वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.त्यामुळे शहरातील युवक – युवती गरबा नृत्यासह इतर नृत्यावर थिरकणार आहेत.
युवक-युवतीच्या सुप्त गुणांना वाव मिळावा या करीता प्रथमतःच सांस्कृतीक कार्यक्रमाकरीता निधी मंजुर करण्यात आला आहे.दोन दिवसीय सांस्कृतीक कार्यक्रमात गरबा नृत्य व इतर नृत्य अंतर्गत खुला स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष व उदघाटक आमदार किर्तीकुमार भांगडिया राहनार असुन त्यांच्याच हस्ते विजेत्या स्पर्धकांना पारितोषीक देण्यात येणार आहे.
शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभाग दर्शवावा असे आवाहन चिमूर नगरपरिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी यांनी केले आहे.