डॉ. नोमेश नारायण यांच्या कवितासंग्रहाला पुरस्कार….

ऋषी सहारे

  संपादक

          महात्मा गांधी महाविद्यालय आरमोरी येथे इंग्रजी विभाग प्रमुख या पदावर कार्यरत प्रा.डॉ.नोमेश नारायण मेश्राम यांच्या राजहंस प्रकाशन पुणे तर्फे प्रकाशित ‘रक्तफुलांचे ताटवे ‘ या नुकत्याच प्रकाशित झालेल्या कवितासंग्रहाला शेगाव येथील प्रतिष्ठित कवितेचे घर प्रतिष्ठानचे स्व.बाबुराव पेटकर काव्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

             ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ.रवींद्र शोभणे ,साहित्य अकादमी पुरस्कार विजेते एकनाथ आव्हाड ,विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते, कवी पी.विठ्ठल ,प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत पेटकर यांच्या हस्ते प्रा.डॉ. नोमेश नारायण यांना सदर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांना पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे विविध स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे.