सावली-(सुधाकर दुधे)

    सावली वनपरिक्षेत्रातील व्याहाड खुर्द उपवन परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या उपरी जंगल परिसरात स्वतःच्या म्हशी चरायला नेले असता खुशाल कवडू शेट्ये वय 50 वर्ष,यांचेवर वाघाने हल्ला करून गंभीर जखमी केले. 

        या घटनेची माहिती जंगल परिसरात जवळपास असलेल्या लोकांना कळताच आरडाओरड करीत घटनास्थळाकडे धाव घेतली,त्यामुळे वाघ तिथुन पळाला.

     जखमी गुराख्यास त्वरित गडचिरोली येतील शासकीय रुग्णालयात दाखल केले.सदर घटना आज दुपारी 3 वाजताच्या दरम्यान घडली.या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.

       व्याहड बूज ते काढोली या रस्त्यालगत अनेक गावे असून वसलेली सर्व गावे ही जंगल परिसरात असल्याने अनेकदा सदर रस्त्यावर वाघ किंवा बिबट यांचे हल्ले झाले व हल्यातंर्गत काही नागरिक मृत्यू तर काही नागरिक जखमी झाले असल्याने वनविभागावर परिसरातील जनतेकडून रोष व्यक्त केला जात आहे. 

      सध्या हलके धान कापणीला सुरुवात झाली असून शेतकऱ्यांच्या शेत्या या जंगलपरिसरात असल्याने वन्यप्राण्यांच्या दाहशतीत धान कापणी सुरू झाली आहे.यामुळे वनविभागानी वन्यप्राण्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी उपरी येथील उपसरपंच आशिष मनबतुलवार यांनी केली आहे.

                      

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com