साकोली :भारतातील केंद्र मंत्री अमित शाह यांनी फिट इंडिया फ्रिडम राईडर बाईक रॅली ला हिरवी झेंडी देऊन त्यांना भारत भ्रमण द्रौरावर त्यांना रवाना करण्यात आले होते.या रॅली मध्ये 75 मोटारसायकल व त्यावर असलेले राईडर 120, आणि त्यामध्ये महिला 10 सामील होते. त्यांना 75 दिवसात 6 अंतराष्टीय सीमा सहित 34 राज्याचे भ्रमण करायचे आहे. त्यांना 250 जिल्हाचे भ्रमण करुन त्यांना 18000 किलोमीटर अंतर सफर करायचं आहे. देशाच्या 75 व्या आजादी महोत्सव निमित्त या रॅली मार्फत प्रचार करण्यात येत आहे. त्याचा या कामगिरी निमित्त साकोली टोल नाक्यावर त्याचा स्वागत फ्रिडम युथ फॉउंडेशन कडून करण्यात आले .त्यावेळी उपस्थिती नेहरू युवा केंद्र भंडारा चे जिल्हा युवा अधिकारी श्री. हितेंद्र वैद्य सर, रमेश अहिरकर सर, फ्रिडम चे अध्यक्ष किशोर बावणे, ड्रा.दिपक चंदवाणी, सूर्यकांत मारर्बते, स्वप्नील गजभिये, कार्तिक लांजेवार, प्रशांत घरडे, साहिल विंदानी, मयूर सोनवणे, रितिक जुनघरे व साकोली पोलीस स्टेशन व उपजिल्हा रुग्णालय साकोली येथील कर्मचारी उपस्थिती होते.