ऋषी सहारे
संपादक
गडचिरोली – “शिक्षण” हा प्रत्येकाच्या जीवनातील मूलभूत आणि संविधानिक अधिकार आहे. आणि संविधानाच्या कलम 14 नुसार वयाच्या 14 व्या वर्षापर्यंत प्रत्येकाला मोफत आणि सक्तीचे शिक्षण देणे हे सरकारचीं जबाबदारी आहे. परंतु खाजगीकरणाच्या या काळाबाजारात ज्यांना मोफत शिक्षण मिळते त्यांना दर्जेदार शिक्षण सरकार कडून मिळत नाही ही शोकांतिका आहे.
खाजगी शाळा मध्ये इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळते पण जिल्हा परिषद शाळेमध्ये इंग्रजी माध्यम नसल्याने जिल्हा परिषद शाळेत शिकणारा मुलगा पुढे स्पर्धेत टिकत नाही. कारण त्याला ती संधीच मिळालेली नसते. दुसरी गोष्ट श्रीमंत , धनाढ्य लोकांसारखे गरीब शेतकरी, मजूर पाल्य ५०-५० हजार फीस खाजगी शाळेत किंवा कॉन्वेंट मध्ये देऊ शकत नाही.
हा एक प्रकारे त्या पाल्यावर व मुलावर अन्याय आणि त्यांच्या हक्क अधिकाराचे हनन आहे. खाजगीकरणामुळे केवळ श्रीमंत मुलांनाच दर्जेदार व उच्च प्रतीच्या वातावरणात शिक्षण मिळते परंतु गरीब, शेतकरी, कामगारांच्या मुलांना पैश्या अभावी खाजगी शाळेत शिक्षण घेता येत नाही. हा सरकारच्या माध्यमातून समाजात निर्माण केलेला जाणीवपूर्वक भेदभाव आहे, असच असा आरोप आझाद समाज पार्टीच्या वतीने करण्यात आला..
या देशातील प्रत्येक मुलास समान शिक्षण मिळावे म्हणून जिल्ह्यातील नव्हे तर समस्त महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषद शाळेत इंग्रजी माध्यम सुरु करण्यात यावे. तसेच देशात आणि राज्यात शिक्षण असमान असू नये याकरिता CBSE (Central Board Secondary Education) माध्यमातून शिक्षण द्यावे. अशी मागणी आझाद समाज पार्टीच्या वतीने करण्यात यावी यासाठी आझाद समाज पार्टीच्या वतीने एकाच दिवशी जिल्ह्यातील सर्व तालुक्यात तहसीलदार व गटशिक्षणाधिकारी मार्फत शिक्षणमंत्री यांना निवेदन देण्यात आले.
गडचिरोली मध्ये युवा आघाडी जिल्हाध्यक्ष विवेक खोब्रागडे, कंत्राटी आघाडी अध्यक्ष अंकुश नैताम, तालुकाध्यक्ष प्रा. नरेश मोहुर्ले यांच्या नेतृत्वात निवेदन दिले.
आरमोरी येथे विधानसभा अध्यक्ष ऋषीभाऊ सहारे, तालुका कार्याध्यक्ष पुरुषोत्तम मैंद, महासचिव ऍड. राज सुखदेवे,तालुका सचिव सुरेंद्र वासनिक, शहर अध्यक्ष प्रशांत भोवते, युवा आघाडी अध्यक्ष शुभम पाटील, पियूष वाकडे, सुधीर सहारे.
कुरखेडा मध्ये किसान आघाडी अध्यक्ष सचिन गेडाम, जिल्हा सचिव कुणाल मच्छीरके, युवा आघाडी अध्यक्ष रोहित कोडवते, आदिवासी विकास परिषदेचे अंकुश कोकोडे यांचे नेतृत्वात चामोर्शी येथे जिल्हासचिव प्रकाश बन्सोड, तालुकाध्यक्ष रघुनाथ वासेकर यांच्या नेतृत्वात वडसा येथे महिला अध्यक्ष संगीता मोटघरे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.