चेतक हत्तीमारे
जिल्हा प्रतिनिधी भंडारा
स्थानिक :- लाखनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर राष्ट्रीय सेवा योजना तर्फे देण्यात येणारे विद्यापीठ स्तरीय पुरस्कार सोहळा 24 सप्टेंबर राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवसानिमित्त घेण्यात आला.
यात विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. संजय दुधे, मुरलीधर बेलखोडे ,अध्यक्ष निसर्ग सेवा समिती वर्धा ,डॉ. सोपानदेव पिसे, संचालक ,राष्ट्रीय सेवा योजना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांच्या उपस्थितीत नुकताच नागपूर येथे संपन्न झाला.
स्वर्गीय निर्धनराव पाटील वाघाये महाविद्यालय, मुरमाडी (तूप) येथील राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक प्रज्वल विष्णुदास सावरकर यांना देण्यात आला. राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत उत्कृष्ट कार्य केल्या बद्दल वर्ष 2023 -24 चा उत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कार म्हणून त्याचा गौरव करण्यात आला.
प्रज्वल सावरकर यांनी यापूर्वी सुद्धा राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत येणारे विविध पुरस्कार मिळविले आहेत. आव्हान शिबिरांतर्गत उत्कृष्ट जिल्हा म्हणून भंडारा जिल्हा गौरविण्यात आला त्यात सुद्धा तो सहभागी होता. तसेच, मोहाडी येथे झालेल्या विद्यापीठ स्तरीय शिबिरामध्ये सुद्धा त्याचा गौरव उत्कृष्ट विनोदी कलाकार म्हणून करण्यात आला होता.
हरहुन्नरी आणि फेसबुक,इंस्टाग्राम,यू ट्यूब,च्या माध्यमातून सर्वसामान्य माणसापर्यंत सहजरीतीने पोहोचलेला म्हणून त्याची ओळख जिल्ह्यात आहे.
आपल्या यशाचे श्रेय त्याने डॉ.संजयकुमार निंबेकर सर,डॉ.श्रीकांत भुसारी सर,विक्की मेश्राम, चंद्रहास खांदारे, तसेच मित्रपरिवार यांना दिले आहे. सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे आता.