दिव्यांगाचे मानधन वेळेवर मिळायला हवे… — युवक काँग्रेस कार्यकर्ते शुभम वि.गजभिये यांची मागणी…

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे 

            वृत्त संपादीका 

      दिव्यांगाना शासनाकडुन पंधराशे रुपये मानधन दिले जात आहे.परंतु त्यांना मिळणारे मानधन वेळेवर मिळत नसल्याने त्यांच्या अत्यावश्यक मुलभूत गरजा आवश्यक वेळी पूर्ण होत नसल्याचे वास्तव चिमूर तालुका युवक काँग्रेस कार्यकर्ता शुभंम वि.गजभिये यांनी समोर आणले आहे.

       दिव्यांगाच्या मुलभूत समस्यासह इतर समस्यांची गंभीर वेदना महाराष्ट्र शासन ऐकून घेत नसल्याने बऱ्याच वेळी त्यांना उपवासाची राहावे लागत असल्याचे भयानक चित्र सुध्दा पुढे आहे.

      यामुळे युवक कॉंग्रेस कार्यकर्ते शुभम विजय गजभिये यांनी त्यांचे मानधन वेळेवर मिळावे यासाठी शासनाकडे पत्रकान्वये मागणी केली आहे. 

      समाजातील संवेदनशील महत्त्वपूर्ण घटक म्हणजे दिव्यांग आहे.तो आजच्या स्थितीत अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत असताना त्यांच्या मानधनाकडे महाराष्ट्र शासनाने जातीने लक्ष देणे गरजेचे आहे.

        शासना कडून मिळणारे मानधन तुटपुंजे असुनही दोन तीन महिन्यांपर्यंत मिऴत नाही.शासनाने आता मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना राबविली असुन,””लाडकी बहिण,यांना पंधराशे रूपये मानधन देत आहे. तेंही एका महिन्यांमध्ये दोन महिन्याचे एकत्रित हप्ता देत आहे.

      मात्र दिव्यांग बांधवांना मात्र तीन तीन महीने मानधन दिले जात नाही हे दुर्दैव आहे.ते नियमित वेऴेवर द्यावे व चंद्रपूर जिल्ह्यातील दिंव्यागांची दखल घ्यावी अशी मागणी चिमूर तालुका युवक काँग्रेस कार्यकर्ता शुभम गजभिये यांनी केली आहे.