कन्हान नदी वरील नविन पुलावर एसटीबसची दुचाकीला जोरदार धडक… — दुचाकी चालकाचा मुत्यु बस चालका विरुध गुन्हा दाखल…

    कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवणी

पारशिवनी : – कन्हान नदीवरील नविन पुलावर नागपुर वरून रामटेक कडे जाणा-या बस चालकाने ओव्हर टेक करित आपले वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवुन दुचा की धडक मारल्याने झालेल्या अपघातात दुचाकी चालक संदीप राऊत यांचा मुत्यु झाला.

        रविवार (दि.२९) सकाळी १० वाजता च्या दरम्यान श्री. अशोक शंकरराव राऊत वय ६५ वर्ष राह. मोदी क्लब, हनुमान मंदिरच्या मागे कामठी जि. नागपुर यांचा मुलगा संदिप अशोक राऊत वय ३४ वर्ष हा कामाला जातो असे सांगुन घरुन दुचाकी क्र. एम.एच.५० सी.के.४१५५ ने गेला होता. दुपारी ४ वाजता त्याला फोन केला तेव्हा त्याने मी घरी येत आहे असे सांगितले होते.

 

        फिर्यादी घरी हजर असताना त्याच्याच मोहल्यातला एका युवका यानी सचिन मानवटकर हा घरी येऊन सांगितले कि संदिपचा अपघात झाला आहे, त्याला कामठीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.

           तेव्हा सर्वजन दवाखाण्यात गेलो तर तिथे एका स्ट्रेचरवर मुलगा संदिप दिसला व तिथे डॉक्टरनी सांगितले कि संदिप मरण पावला आहे. तिथेच माहीत पडले कि सायकाळी ५ वा दरम्यान संदिप त्याचे मोटारसायकलने कामावरून कन्हान वरुन आपल्या घरी कामठीला घरी येत असताना कन्हान नदिच्या नविन पुलावर नागपुर ते रामटेक जाणा-या बस क्र.एम.एच.४० एन ८६२६ च्या चालकाने ओव्हरटेक करित असताना भरधाव वेगाने येवुन संदिपच्या दुचाकी ला जोरदार धडक मारली त्यामुळे संदिप खाली रस्त्यावर पडला.

           त्याला जबर मार लागल्याने लोकांनी त्याला उपचाराकरीता कामठी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तिथे डॉक्टरनी तपासुन मृत घोषीत केले.

          मुलगा संदिप अशोक राऊत हा कन्हान वरुन कामठी येथे त्याचे दुचाकीने क्र. एम.एच.४० सी. के.४१५५ ने घरी येत असताना समोरुन नागपूर ते रामटेक जाणा-या बस क्र. एम. एच.४० एन ८६२६ च्या चालकाने भरधाव वेगाने व ओव्हरटेक करित दुचाकीला धडक मारल्यामुळे संदिपचा जागीच मृत्यु झाला आहे.

          अश्या फिर्यादी वडिलांच्या तक्रारीवरून कन्हान पोलीसानी थानेदार राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनात आरोपी बस चालका विरूध्द गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस करित आहे.