महापुरुषांच्या मानवतावादी क्रांतीला डोक्यात न घेता डोक्यावर घेऊन नाचणाऱ्या दोन पायाच्या दानवांचा देश म्हणजे…..
महापुरुषांना ( त्यांनी केलेल्या वैचारिक क्रांतीला समजून न घेता त्यांना ) त्यांच्या पुतळ्यात, स्मारकात, स्मारकात आणि प्रतिमेत बंदिस्त करुन त्यांच्या विटंबनेतून दंगली घडवीणारा एकमेव देश म्हणजे…….
केवळ महापुरुषांच्या जयंती आणि स्मृतिदिन यांना भांडवल समजणाऱ्यांचा देश म्हणजे…….
महापुरुषांनी सांगितलेल्या आदेशांच्या नेमक्या विरुद्ध आचरण करणाऱ्यांचा देश म्हणजे…….
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्मिलेल्या संविधानातून जागृत होऊन भारतीय नागरिक न बनण्याचा निर्धार करणाऱ्यांचा देश म्हणजे………
खोटे विद्वान बनण्यासाठी स्वतःच्या घरात शेकडो ग्रंथाचा संग्रह करुन त्यातून वैचारिक स्वार्थाच्या पलीकडे न जाणाऱ्या खोट्या विद्वानांचा देश ( बोटावर मोजण्या इतके अपवाद सोडून ) म्हणजे………
नैसर्गिक तटबंदी देशाला चारही बाजूनी लाभलेली असतांना, आमच्याच देशावर परकीयांनी आक्रमण करुन लुटून , त्यांचे कुसंस्कृतीक आणि राजकीय गुलाम बनण्याचा देश म्हणजे………
देशाच्या स्वातंत्र्यानंतर लोकशाही आणि संविधान यांचे महत्व न जाणता आपल्याच धार्मिकतेच्या मानसिक गुलामीच्या वर्तुळातून बाहेर न पडणाऱ्यांचा देश म्हणजे………
सर्वच राजकीय पक्ष व नेत्यांच्या उपकारावर तरलेल्या लोकशाही व संविधान यांची बेगडी व्यवस्था निर्माण करणाऱ्या व्यवस्थेला निमूटपणे शरण जाणाऱ्यांचा देश म्हणजे………
140 कोटी लोकसंख्या असलेला, त्यापैकी केवळ 5 कोटी लोकसंख्या असलेल्या RSS वादी कूटनितीचे अनुकरण करुन गुमान आणि निमूटपणे गुलाम बनणाऱ्यांचा देश म्हणजे……….
लेखणीतून आणि वक्तव्यातून जागृतीसाठी अणुबॉम्ब व हायड्रोजन टाकणाऱ्या महापुरुषांचा एकेकाळी असणारा देश, स्वातंत्र्यानंतरच्या केवळ 60 वर्षात पुन्हा कुटनीतीच्या दिशेने गुलाम म्हणून जाणाऱ्या नागरिकांचा देश म्हणजे……….
महापुरुषांच्या सर्वांगीण वैश्विक, वैचारिक आणि आचारिक क्रांतीनंतर अवघ्या 60 वर्षात वैचारिक गोंधळ आणि संभ्रमात सापडणारा आणि परिणामी पुन्हा गुलामीकडे जाणारा एकमेव देश म्हणजे……..
भारत देश
यावर उपाय काय……..?
उपाय आहे काय…….?
उपाय असेल तर तो आम्ही स्वीकारणार का…..?
स्वीकारणार नसू , तर असेच प्रवाहात वाहत जाऊन बुडून संपणार का….?
आणि आपणच आपल्या वयक्तिक स्वार्थी समाधानासाठी निर्माण केलेल्या मानसिक वर्तुळात शेवटचा श्वास घेणार का….?
वरील सर्व प्रश्नांची उत्तरे शोधून ग्रुपवर टाकून अभिव्यक्त न होण्याचा निर्धार करणाऱ्या गुलामांचा देश आहे का…..?
हे तपासण्याची माझी टेस्ट आहे……..
कोन किती अभिव्यक्त होते ते पाहू……..?