सार्वजनिक वाचनालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर प्रदर्शनी प्रदर्शित… — खासदार सुनिल मेंढे यांच्या हस्ते प्रदर्शनीचे उद्घाटन….

 

प्रितम जनबंधु

  संपादक 

 

भंडारा :-

              पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती पर्यंत सेवा पंधरवाड्याचे आयोजन भाजपच्या वतीने करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर व कार्यावर आधारित चित्र प्रदर्शनीचे उद्घाटन खासदार सुनील मेंढे यांच्या हस्ते करण्यात आले.

भंडारा येथील सार्वजनिक वाचनालयात प्रदर्शनी प्रदर्शित करण्यात आली आहे. 

             खासदार सुनील मेंढे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना येणाऱ्या प्रत्येक संधीकडे सकारात्मकतेने बघावे तद्वतच मोबाईलच्या नादी न लागता, मोबाईलचा वापर योग्य पद्धतीने करुन घ्यावा आणि वास्तविकता समजून वाटचाल करावी, असा मौलिक सल्ला यावेळी त्यांनी दिला. 

          भंडारा शहरातील शाळा आणि महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांनी प्रदर्शनी बघण्यासाठी अवश्य उपस्थित रहावे असे आवाहन भाजपाचे शहराध्यक्ष सचिन कुंभालकर यांनी केले आहे.

           यावेळी प्रामुख्याने चैतन्य उमाळकर, आशु गोंडाने, संजय कुंभलकर, अनुप ढोके, महेंद्र निंबार्ते, संतोष त्रिवेदी, आबिद सिद्दिकी, रुबी चड्डा, सचिन कुंभलकर, निशिकांत ईलमे, तुषार काळबांडे, सूर्यकांत ईलमे, मनोज बोरकर, कैलास ताडेकर, प्रशांत निंबोळकर, सुखदेव वंजारी, रौनक उजवणे, साधना त्रिवेदी, माला बगमारे, चंद्रकला भोपे, गीता सिडाम, मधुरा मदनकर, आशा उईके, रोशनी पडोळे, माधुरी तूमाने, सौ घोलपे, अर्चना श्रीवास्तव, बंटी ताडेकर, प्रशांत पुरुषार्थी, सुशील पडोळे, यश ठाकरे, तुषार हट्टेवार, अभिषेक राऊत, अक्षय गिरडकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.