दर्यापुरात गणपती विसर्जन दरम्यान घडले हिंदू मुस्लिम एकतेचं दर्शन.. — मुस्लिम बांधवांनी मज्जिद समोर गणपतीला केले हारार्पण…

युवराज डोंगरे/खल्लार

    उपसंपादक

         दर्यापूर तालुका हा नेहमीच जातीय सलोखा कायम ठेवणारा तालुका म्हणून ओळखला जातो या तालुक्यात विविध जाती धर्मातील नागरिक एकत्रितपणे नांदतात कुठल्या ना कुठल्या व्यवसायाने हिंदू मुस्लिम व इतर समाजातील नागरिक हे जुडले गेले आहेत. तर यंदा अनंत चतुर्दशी आणि ईद-ए-मिलाद हे दोन्ही धार्मिक उत्सव एकाच दिवशी आल्याने पोलीस प्रशासनाचा ताण अधिक वाढला होता परंतु कुठलाही अनुचित प्रकार यावेळी घडला नाही. 

           परीने साजरी केले जातात त्याचबरोबर गणपती उत्सव दरम्यान शहरातील सामाजिक संघटनांनी व दर्यापूर पोलीस स्टेशन यांच्या माध्यमातून शांततेचा संदेश देण्यात आला कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून विविध उपायोजना पोलीस प्रशासनाकडून कार्यान्वित करण्यात आल्या होत्या.

         त्यामध्ये शहरातील विविध सामाजिक संघटनांनी व प्रामुख्याने काँग्रेसचे नवनिर्वाचित शहराध्यक्ष आतिष शिरभाते यांनी मज्जित समोर आपल्या कार्यकर्त्यांसमवेत उभे राहून तेथील परिसर सुरक्षित करून त्यावेळी मुस्लिम बांधवांनी सुद्धा गणरायाला शाल श्रीफळ देऊन हारअर्पण केले या अगोदर सुद्धा तेथे असाच पहारा देण्यात आला होता तर या वेळी गणेश विसर्जन मिरवणुकीत समानतेचा संदेश देण्यात आला.

         यावेळी प्रणय बिहाडे पप्पू बुंदिले गणेश धुराटे राजूभाऊ भांडे असलम भाई घानिवाले बक्करसेठ घानिवाले सह गणेश भक्त उपस्थित होते.