एक दिवस एक तास स्वच्छतेसाठी,आपल्या कन्हान-पिपरी शहरासाठी… — चला करूया,”स्वच्छ कन्हान-पिपरी,सुंदर कन्हान-पिपरी…

 

     कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी..

           कन्हान-:- केन्द्र शासनाचे महत्व काशी अभियान स्वच्छ भारत अभियान २.० अमल बजावणी अर्तगत ” स्वच्छता ही सेवा” एक स्वच्छतेची लोकचळवळ व्हावी या करिता नगर परिषद कन्हान-पिपरी द्वारे“स्वच्छता हि सेवा ” या अभियांनाच्या अंतर्गत रविवार १ आक्टोंबर रोज रविवारला,‘ स्वच्छता श्रमदान ’(“एक तास एक साथ”) हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

         समाज भवन हनुमान नगर कन्हान येथे स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे.या करिता शहरातील नगराध्यक्ष,उपाध्यक्ष,नगरसेवक व नगरसेविका,सर्व राजकीय पक्षाचे अध्यक्ष,पदाधिकारी,स्वातंत्र संग्राम सैनिक यांचे परिवारातील सदस्य,सामाजिक कार्यकर्ते,पत्रकार बंधु,तसेच शहरातील सर्व नागरिकांना व विविध मंडळांना विनंती करण्यात येते की,”स्वच्छता श्रमदान,करण्यासाठी न चुकता हजर रहावे असे आव्हान नगरपरिषदेचे नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या कडून करण्यात आले आहे.

         याचबरोबर स्वच्छता अभियानातंर्गत १ आक्टोंबरला सकाळी १० वाजता उपस्थित राहण्यासंबंधाने नगराध्यक्ष,मुख्याधिकारी व उपक्रम समन्वयक याचेशी संपर्क साधावा असे आव्हान केले आहे.