कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी..
पारशिवणी:- पारशिवनी शहरातील नगर पंचायत तर्फे प्रशासक अर्चना भिवगडे यांनी सर्व नागरिकांना विनंती केली की केन्द्र शासनाच्या महत्वकांशी अभियान,”स्वच्छ भारत, अभियान २.० अमल बजावणी अर्तगत ” स्वच्छता ही सेवा” एक स्वच्छेतेची लोकचळवळ व्हावी या करिता अभियानात दि. ०१ ऑक्टोबर २०२३ रोज रविवारला ‘एक तास स्वच्छतेचा’ या स्वच्छता श्रमदान अभियानात सहभागी होऊन नगरपंचायत पारशिवनीला सहकार्य करावे.
हे स्वच्छतेचे अभियान, पारशीवनी शहरात,शिवाजी चौक, मार्केट परिसर येथे राबविण्यात येत आहे.
यामध्ये सहभागी होण्यासाठी उप्रकम समन्वयक यांचेशी संपर्क साधावा आणी रविवार ०१ ऑक्टोबर रोजी सकाळी 10 ते 11 या कालावधीत श्रमदान करून आपले योगदान द्यावे असी विनंती नगर पंचायत प्रशासक यांनी केली आहे.