ईद मिलादून नबी निमित्त मुरुमगाव येथे जूलूस ए मोहम्मदी काढण्यात अली..

भाविक करमनकर  

धानोरा प्रतिनिधी

        धानोरा तालुक्यातील मौजा मुरुमगाव येथे ईद मिलादुनब्बी निमित्त दिनांक 28 सप्टेंबर ला रबिऊल अव्वल हजरत पैगंबर मोहम्मद सल्लललाहू अलैहि व सल्लम च्या जन्म दिनानिमित्त मुरुमगाव च्या मुस्लिम बांधवानी मोठ्या धूम धड्याक्यात शानदार जूलूस चे आयोजन केले हा जुलूस संपूर्ण मुरुमगावातुन काढण्यात आला सलाम पैगंबर मोहम्मद की शान कोणताही वाजागाजा न करता शांतीपूर्ण जूलूस काढण्यात आला या जुलूस नंतर सुन्नी जामा मस्जिद मुरुमगाव येथे फातिहा पठण करून ध्वजारोहण करण्यात आले प्रेषित पैगंबर मोहम्मद सल्लललाहू अलैही व सल्लम यांच्या जन्म दिनी शरबत मिठाई संपूर्ण मुरुमगाव येथील जनतेला वाटण्यात अली यावेळी शुभेच्छा एकमेकांना देण्यात आल्या.

   या कार्यक्रमला मोहम्मद शरीफ भाई कुरैशी, मोहम्मद आरिफ भाई कूरैशी, मोहम्मद शाहिर कूरेशी, मोहम्मद मूनिर शेख,मोहम्मद शाकीर शेख, मोहम्मद सहिद शेख, मोहम्मद रहिद शेख, मोहम्मद असलम शेख, मोहम्मद फिरोज भाई कुरैशी, मोहम्मद महेमूद पठान, बाबर कूरैशी, फीरोज पठान, गोरेखा पठान, कयामूददीन शेख, मोहम्मद नईम शेख, ईन सर्व मुस्लिम बांधवानी सहकार्य केले