नांदरुन येथे वर्षावास कार्यक्रमाचा समारोप..

 

युवराज डोंगरे/खल्लार

     उपसंपादक

       नजिकच्या नांदरुन येथील  बुद्ध विहारात वर्षावास निमित्ताने बुद्ध आणि त्याचा धम्म ग्रंथ वाचन समारोप कार्यक्रम पार पडला.

          वषार्वास काळात सदर बुद्ध विहारात,दररोज “बुद्ध आणि त्याचा धम्म,या ग्रंथाचे वाचन करण्यात आले.

        ग्रंथ पठण गावातील कु. प्रियंका बाळू रायबोले यांनी केले आहे.सुरवातीला पंचशील,ध्वजारोहण,भारतीय सैन्यात रुजू असलेले सैनिक संदीप कैलास रायबोले,शुभम रामकृष्ण तेलगोटे यांचे हस्ते करण्यात आले व तसेच तथागत गौतम बुद्ध ,महात्मा ज्योतिराव फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते हारार्पण आणि पुष्प अर्पण करण्यात आले.

           बौद्ध बांधवानी याप्रसंगी पंचशील ग्रहण केले. कु प्रियंका रायबोले यांनी वषार्वास आणि बौद्ध धम्मा विषयी माहिती विशद केली. 

         कार्यक्रम यशस्वीतेसाठी बौद्ध उपासक,उपासिका यांची टीम व ग्रंथ पठन महिला,पूर्ण बौद्ध उपासक व उपासिका यांनी परिश्रम घेतले.