युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
पिसाळलेल्या माकडांनी वृध्द इसमावर प्राणघातक हल्ला करुन रक्तबंबाळ अवस्थेत जखमी केल्याची घटना दर्यापूर तालुक्यातील लोतवाडा येथे आज दि 30 सप्टेंबरला सकाळी 10:00 वाजताच्या सुमारास घडली या घटनेमुळे गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अवधुतराव दौलतराव कु-हाडे रा.लोतवाडा,ता.दर्यापूर असे जखमी वृध्द इसमाचे नाव असून अवधुतराव कुऱ्हाडे यांच्यावर पिसाळलेल्या 10 ते 12 माकडांनी दि. जिवघेणा हल्ला जिवघेणा हल्ला केला आहे.
सदर व्यक्ती हे लोतवाडा बसस्टॅंड वर पायी चालत असतांना पिसाळलेल्या माकडांनी प्राणघातक हल्ला करुन गंभीर जखमी केले त्यांना तत्काळ रक्तबंबाळ अवस्थेत उपचारासाठी दर्यापूर येथे उपजिल्हारुग्णालयात भरती करण्यात आले परंतू तेथून त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय
येथे पुढील उपचाराकरीता पाठविले असून तिथे ते उपचार घेत आहेत.तरी संबंधित वनविभाग कार्यालय परतवाडा यांनी याची त्वरित दखल घेऊन लवकरात लवकर या माकडांचा व रानटी डुक्कर तसेच हरीन यांना पकडून जंगली वनात घेऊन जावे व शेतकरी तसेच सामान्य नागरीकांना दिलासा द्यावा.अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे
कोट
अशाच प्रकारे मागील वर्षी सुद्धा कात्रे नामक महिलेवर तिच्या राहत्या स्वताच्या घरावर हल्ला केला होता. तेव्हा पण ती महिला गंभीर जखमी झाली होती.वनविभागाने वन्य प्राण्यांचा त्वरित बंदोबस्त करण्यात यावे.
भिमराव कुऱ्हाडे