आळंदीत उद्या खा.शरद पवार आणि आ.दिलीप मोहिते पाटील एकाच व्यासपीठावर… — ग्रामदैवत हजेरी मारुती मंदिर सभामंडपाच्या दगडी कामांचा शुभारंभ…

दिनेश कुऱ्हाडे

उपसंपादक 

पुणे विभागीय 

आळंदी : येथील ग्रामदैवत हजेरी मारुती मंदिराच्या सभामंडपाच्या दगडी कामांचा शुभारंभ उद्या रविवारी सकाळी ९ वा. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि आमदार दिलीप मोहिते यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे असे माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर पाटील यांनी सांगितले आहे.

         महाराष्ट्रातील सत्तेत अजित पवार हे सहभागी झाले त्यानंतर राज्यात शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले प्रामुख्याने अजित पवार गटात अनेक आमदार सहभागी झाले त्यात खेड-आळंदी विधानसभेचे आमदार दिलीप मोहिते पाटील हे अजित पवार गटात सहभागी झाले. त्यानंतर प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि आमदार दिलीप मोहिते पाटील हे एका कार्यक्रमात एकत्र येणार आहे. हे दोन्ही नेते एकत्र कार्यक्रमाला उपस्थित राहणार का..? तसेच ते काय बोलणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.