ऋग्वेद येवले
नागपूर विभागीय प्रतिनिधी
साकोली : गणेशोत्सवात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कलागुणांना वाव मिळावा यासाठी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा साकोली आमदार नाना पटोले यांनी संपूर्ण विधानसभा क्षेत्रात निबंध, वकृत्व संभाषण स्पर्धेचे आयोजन केले होते. यात साकोली येथे जिल्हा परिषद केंद्र उच्च प्राथमिक शाळा क्रं ०१ येथे स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी यात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि बक्षीसांचे मानकरी ठरले.
सदर स्पर्धेत विषयांतील महिला सुरक्षा, बेरोजगारीवर नियंत्रण, माझा आवडता सण असे विविध विषयांवर निबंध वकृत्व संभाषण स्पर्धा गणेश वार्डात घेण्यात आली. प्रसंगी स्पर्धा आयोजनात प्रमुख अतिथी भंडारा जिल्हा असंघटित कामगार अध्यक्ष मार्कंडराव भेंडारकर, साकोली पोलीस ठाणे निरीक्षक राजेशकुमार थोरात, शहर काँग्रेस अध्यक्ष दिलीप मासूरकर, केंद्र प्रमुख बी. के. मुंगमोडे, मुख्याध्यापक डि. डि. वलथरे, लता द्रुगकर, दिपक थानथराटे, विवेक बैरागी, असंघटित कामगार तालुका अध्यक्ष आदित्य चेडगे, श्री बाल गणेश उत्सव मंडळातील आशिष कापगते, रोहित गुप्ता, राजू देशमुख अन्य उपस्थित होते. या निबंध वकृत्व स्पर्धेत वर्ग ६ व ७ वीतील ३० विद्यार्थ्यांनी भाग घेतला. उत्कृष्ट निबंध वकृत्व संभाषण स्पर्धेतील विद्यार्थीनींना उत्तेजनार्थ पारितोषिक प्रदान करण्यात आली.
जिल्हा परिषद केंद्र उच्च प्राथमिक शाळा क्रं ०१ साकोली येथे पार पडलेल्या या स्पर्धेत सहा. शिक्षक आर. आर. बांगरे, एम. व्ही. बोकडे, टि. आय पटले, शालिनी राऊत, बलविर राऊत, कार्तिक साखरे, आरती कापगते आणि श्री बाल गणेश उत्सव मंडळाचे कुणाल देशमुख, प्रज्वल रोकडे, शैलेश गोबाडे, अरविंद डुंभरे, मयूर देशमुख, तरूण जैन, वरूण देशमुख, रितीक तिडके, स्वपनिल गजभिये, अमेय डुंभरे, नामदेव शेंडे आदींनी सहकार्य केले. संचालन शिक्षिका शालिनी राऊत यांनी तर आभार एम. व्ही. बोकडे यांनी केले.