डॉक्टर कु.दर्शनी चिंचोळकर हिने केंद्रीय लोकसेवा आयोगाची मेडिकल सर्व्हिस परिक्षा उत्तीर्ण करून उंचावले चांदूर बाजार तालुक्याचे नाव..

 

अमरावती(जिल्हा प्रतिनिधी)

 चांदूर बाजार(जि अमरावती) येथील रहिवासी डॉक्टर कु.दर्शनी संजयराव चिंचोळकर हिने नुकत्याच घोषित केंद्रीय लोकसेवा आयोगाचे मेडीकल सर्व्हिस परिक्षेत ऑल इंडीया रॅक 215 मिळवून केंद्र सरकारच्या डिव्हिजन मेडिकल ऑफिसर ग्रेड-1 पदी निवड झाल्याबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

    एप्रिल महिन्यात दिल्ली येथे केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे मुलाखत आयोजित करण्यात आल्या होत्या .त्याचा निकाल आयोगाने नुकताच जाहीर केला.त्यात डॉक्टर दर्शनी हिने हे यश संपादन करून चांदूर बाजार तालुक्याचे नाव आपल्या यशाने उंचावले आहे.

डॉक्टर दर्शनी हिचे वडील संजयराव चिंचोळकर हे शिवाजी शिक्षण संस्थेत मुख्याध्यापकपदी कार्यरत असून आई अर्चना चिंचोळकर ह्या चांदूर बाजार येथील नगर परिषद विद्यालय येथे शिक्षिका आहेत.दर्शनी हिने एम.बि.बि.एस.चे शिक्षण सेवाग्राम मेडिकल कॉलेज येथून प्राविण्य श्रेणित पूर्ण केले.सध्या ती रत्नागिरी येथील वैद्यकीय महाविद्यालयामध्ये एम.डी. मेडिसिन मध्ये पोस्ट ग्रॅज्युएट करीत आहे. वैद्यकिय शिक्षण सुरू असतांनाच तीने युपीएससी ची परिक्षा उत्तीर्ण केली.

डॉक्टर दर्शनी हिच्या यशाबद्दल प्रा.राजाभाऊ काळमेघ, प्रा.सतिश अघडते ,अनिल लांडे मित्र मंडळ,तसेच धनगर अधिकारी कर्मचारी संघटना महाराष्ट्र व अहिल्या महिला परिषद ,अमरावती यांनी जाहीर अभिनंदन केले आहे.