उपसंपादक/ अशोक खंडारे
मराठी भाषा ही समृद्ध परंपरा लाभलेली अर्थ प्रसव अशी गोडवा असलेली भाषा आहे. भाषा टिकण्यासाठी बोली जिवंत राहणं अत्यंत गरजेचे आहे.आता अनेक बोली नष्टप्राय होत चालल्यात अशा अवस्थेत मराठीचा डोलारा कोलमडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून बोलीला अधिक महत्त्व देत विद्यार्थ्यांनी बोलीतून लेखन करणे गरजेचे असल्याचे मत भूभरीकार कवी अरुण झगडकर यांनी व्यक्त केले. ते महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय आष्टी येथील मराठी वांड्मय मंडळाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय फुलझले होते .तर प्रमुख अतिथी कवडसाकार कवी प्रशांत भंडारे, मराठी विभाग प्रमुख डॉ. राजकुमार मुसने, प्रा.नासिका गभणे,डॉ. भारत पांडे, डॉ. रवी शास्त्रकार, प्रा.रवी गजभिये, प्रा.श्याम कोरडे, प्रा.ज्योती बोबाटे,प्रा.विजया सालूरकर उपस्थित होते.कवी प्रशांत भंडारे यांनी बोलीविषयी न्यूनगंड न बाळगता बोलीचा अभिमान बाळगत काळजातून निघणारे शब्द बोलीतून उतरवण्याचा सल्ला दिला.त्यांनी साहित्य प्रकाराचे वर्गीकरण स्पष्ट करून कविता लिहिण्यासाठी आवश्यक गुणांचा परिचय विद्यार्थ्यांना करून दिला .पायल पुल्लीवार या विद्यार्थीनीने काव्यवाचन केले.मराठी विभागातील प्रा.नासिका गभणे व प्रा.डाॕ.राजकुमार मुसणे यांनीही मार्गदर्शन केले.अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य डॉ. संजय फुलझेले यांनी महाविद्यालयातील मराठी विभाग हा उपक्रमशील विभाग असून वेगवेगळ्या उपक्रमातून साहित्यिक निर्माण करण्याचा प्रयत्न असतो .यापूर्वी नाट्य कलावंत, कवी, कथाकार या महाविद्यालयातून मराठी विभागाने निर्माण केलेले आहेत. तोच वारसा अजून पुढे चालू राहावा अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे संचालन स्मिता भंडारे हिने तर प्रास्ताविक दुषाली अलगमकर हिने केले तर उपस्थितांचे आभार पायल मडावी हिने मानले .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. जगदीश, स्मिता, विश्वजित,सावली,शीतल,सुरज,निखिल यांनी विशेष परिश्रम घेतले.