सावली (सुधाकर दुधे)

 

  दि . ३०सप्टेंबर पोषण अभियान २०२२ अंतर्गत सावली पंचायत समिती येथे एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प सवलीतर्फे ‘ स्वस्थ बालक बालिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले . या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून गट विकास अधिकारी सौ सुनीता मरसकोल्हे , अध्यक्ष म्हणून तहसीलदार परीक्षित पाटील यांच्यासह तालुका आरोग्य अधिकारी धनश्री औघड लोकेश खंडाळे गट शिक्षण अधिकारी प्रमोद जोनमवार बालविकास प्रकल्प अधिकारी आदी उपस्थित होते . सावली तालुक्यामध्ये पोषण अभियानाअंतर्गत १ ते ३० सप्टेंबर या कालावधीत समाजामध्ये पोषणाबाबत जनजागृती करण्यात आली . व्यापक प्रमाणात कार्यक्रम घेतल्यामुळे पोषण अभियानाला लोक चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले . मातांना बालकांच्या पोषणाविषयी सक्षम करण्यासाठी आणि त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी सावली प्रकल्पाने प्रत्येक अंगणवाडीत स्वस्थ बालक बालिका स्पर्धा आयोजित केली . ६ महिने ते ३ वर्षे आणि ३ ते ५ वर्ष या वयोगटातील स्वस्थ बालक बालिकांची निवड अंगणवाडी केंद्रात करून त्यापैकी सहा बालकांची निवड प्रकल्प स्तरावर करण्यात येऊन सावली पंचायत समितीच्या सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करून पारितोषिक व प्रशस्ती पत्रक देण्यात आले पोषण अभियान अंतर्गत नागरिकांना पोषणाचे महत्त्व कळावे याकरिता अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी कार्यकमा पोषण आहाराची प्रदर्शनी लावण्यात आली . कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी प्रमोद जोनमवार यांनी केले संचालन पर्यवेशिका पद्मा मोहूर्ले यांनी तर आभार शालिनी मशाखेत्री यांच्यासह एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प तसेच सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस आदी उपस्थित होते .

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com