पारशिवनी:- तालुका तिल ग्राम पंचायत बोरी सिंगारदिप येथे आज दिनांक 30/09/2022 रोजी सकाळी 8.00 वाजता स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण ) टप्पा 2 अंतर्गत स्वच्छता ही सेवा अभियान कालावधीत अर्न्तगत ग्रामपंचायत बोरी सिंगरदीप येथे मा जिल्हा परिषद सदस्य श्री वेंकटजी कारेमोरे तसेच श्री नरेश भाऊ मेश्राम पंचायत समिती सदस्य व गटविकास अधिकारी सुभाष जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वच्छता ही सेवा अभियान अंतर्गत ग्रामपंचायत बोरी मध्ये श्रमदानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी समिती परिषद शाळेत मध्ये सदर कार्यक्रमाच्या शुभारंभ करण्यात आला.
मुलांच्या जनजागृती रॅली मधून गावातील लोकांना स्वच्छतेच्या संदेश देण्यात आले त्याचप्रमाणे गावातील व ग्रामपंचायत परिसरातील प्लास्टिक व इतर कचरा एकत्रित करून प्लास्टिक कचरा वेगळा व इतर सुखा कचरा वेगळा याप्रमाणे पिशवीमध्ये भरून त्याचे योग्य वेळी वाट लावण्यात आले त्याच प्रमाणे शाळेतील मुलांना तसेच गावातील समस्त ग्रामवासी नागरिकांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली.
त्यानंतर सदर कार्यक्रमाच्या समारोप ग्रामपंचायत कार्यालय चे पटागणात येथे करण्यात आला
या प्रसंगी जिं प सदस्य श्री वेंकटजी कारमोरे यांनी लोकांना स्वच्छता अभियानात मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन गावात स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणात काम करण्यासाठी आव्हान केले, तसेच पंचायत समिती चे गटविकास अधिकारी सुभाष जाधव यांनी सर्व ग्रामवासी नागरिकांना स्वच्छतेचे फायदे प्लास्टिक कचरा संकलन करून त्याच्या विल्हेवाट कसे लावावे तसेच प्लास्टिक बंदी चे फायदे लोकांना समजून पटवुन सांगितले यावेळी ग्रामपंचायत बोरी चे सरपंच श्री इंगोले ,ग्रामपंचायत उपसरपंच , ग्रामपंचायत सदस्य , सचिव, पंचायत समिती चे तालुका पाणी व स्वच्छता विभागाचे श्री मुनेश दुपारे,श्री देवानंद तुमडाम , जिल्हा परिषद शिक्षक श्री कडू सर व इतर ग्रामपंचायत कर्मचारी नरेगा विभागाचे दिनेश कांबळे एम एस आर एल एम विभागाचे अंकुश शुक्ला व गावातील सर्व नागरिक शाळेतील विद्यार्थी विद्यार्थीनी पालक वर्ग, तसेच शेतकरी गावकरी मोठ्या संख्येत उपस्थित होते,