पारशिवनी :-रायनगर येथे दोन अज्ञत आरोपीनी आम्ही पोलिस वाले म्हणुन ३७.५०० रुपयाचे दोन अंगठी घेऊन पसार झाल्याने पो.स्टे . कन्हान अंतर्गत उतरेस ०१ कि.मी अंतरावरील कुलदिप हॉलच्या समोर एन एच ७ रोड कन्हान येथे मंगलवारदिनांक २७ / ० ९ / २०२२ चे ० ९ .३० वा . दरम्यान फिर्यादी नामे – रामराव बाबुराव मानकर , वय ७४ वर्ष , रा . दिवटे ले आउट वार्ड नं . १० कळमेश्वर हे घराबाहेर फिरायला निघाले असता कुलदिप हॉलच्या समोर एन एच -७ रोड चेतन पानठेल्याच्या बाजुला रोडवर फिर्यादीला दोन अज्ञात आरोपी भेटले . त्यापेकी एका आरोपीने म्हटले की , ‘ आम्ही पोलीसवाले आहोत व त्यांनी फिर्यादीला त्याचा आय कार्ड दाखविला व त्यांनी फिर्यादीला म्हटले की तुम्ही हातामध्ये अंगठी घालु नका इथे चोरी होत आहे व त्यांनी अंगठी काढायला लावली व फिर्यादीने दोन अंगठी अंदाजे ७.५ ग्राम किंमत अंदाजे ३७,५०० / – रू . काढुन अज्ञात आरोपीच्या हातात दिले व नंतर दोघेही तिथुन पळुन गेले . त्या दोन्ही अज्ञात आरोपीने फिर्यादीस विश्वासात आणुन फिर्यादीचा विश्वासघात केले . सदर प्रकरणी फिर्यादी रामराव बावुराव मानकर राहणार कळमेश्वर यांचे रिपोर्ट वरुन पो.स्टे . कन्हान येथे आरोपीविरुध्द अपराध क्रमांक ५५८/२२ चा तहत कलम ४२० , ३४ भादंवि अन्वये गुन्हा नोंद केला आहे . आरोपीतांचा शोध घेणे सुरु आहे . सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलिस निरिक्षक विलास का ळे यांचे मार्गदर्शनात पोलिस हवालदार प्रशांत रामटेके हे पुढील तपास करीत दोन्ही अज्ञात आरोपी चा शोध घेत आहे .

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com