ड्रीम चंद्रपूर तर्फे आयोजित “क्रीडा पर्व 2024” ची सांगता…. — आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते मान्यवरचा सत्कार….

प्रेम गावंडे 

उपसंपादक 

दखल न्यूज भारत 

     डेव्हलपमेंट अँड रिसर्च एज्युकेशन मल्टीपर्पज सोसायटी (ड्रीम) चंद्रपूर तर्फे मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून दिनांक 25 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट 2024 पर्यंत “क्रीडा पर्वाचे आयोजन करण्यात आले होते.

          29 ऑगस्ट 2024 रोजी संध्याकाळी 5:30 वाजता शहरात बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे ही रॅली श्रमिक पत्रकार भवन,वरोरा नाका,चंद्रपूर इथून चालू होऊन परत तिथेच परत येऊन त्याचे रूपांतर समारोपीय कार्यक्रमात झाले.

      या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंजि.प्रदीप अडकीने सामाजिक कार्यकर्ता

होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून आ. किशोर भाऊ जोरगेवार चंद्रपूर क्षेत्र,आशिष मासिरकर सामाजिक कार्यकर्ता,अनुताई दहेगावकर सामाजिक कार्यकर्ता,अब्दुल रहेमान वरिष्ठ हॉकी खेळाडू,बबन शेख वरिष्ठ हॉकी खेळाडू यांची प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते. 

             या कार्यक्रमात जिल्हात उल्लेखनीय कामगिरी करणारा खेळाडूचा सत्कार करण्यात आला.तसेच क्रीडा पर्वात आयोजित सर्व स्पर्धाचे बक्षीस वितरण करण्यात आले. 

              या “क्रीडा पर्वा” ला यशस्वी करण्यासाठी ड्रीम चंद्रपूरचे अध्यक्ष प्रेम गावंडे,उपाध्यक्ष अभिजीत दुर्गे,सचिव अनिल ठाकरे,कोषाध्यक्ष शेंडे,रुपेश चव्हाण सचिव हॉकी प्रमोटर असोसिएशन चंद्रपूर,विक्की पेटकर,निखिल पोटदुखे,अमोल सदभैय्ये,सोनाली गावंडे,आयेशा खान,प्रियंका मंडल,श्रुती भारती,समृद्धी गेडाम,करिष्मा राजपूत,शर्वरी लभाणे,निधी झाडे,कोमल चौधरी,शुभम साखरे,शुभम पुणेकर,लोकेश मोहुर्ले,दिनेश सावसाकडे,आकाश इंगळे,सिद्धार्थ सूर्यवंशी,अपूर्व खुलसंगे,स्वप्निल घोंगडे आदीने परिश्रम केले.