जिल्हाधिकारी संजय दैने यांनी गडचिरोली जिल्ह्यातील,”वृद्ध कलावंतांना,दिला मोठा दिलासा…

प्रदीप रामटेके 

 मुख्य संपादक 

       महाराष्ट्र राज्यांतर्गत शेवटच्या टोकावर असलेल्या आदिवासी,मागासवर्गीय गडचिरोली जिल्ह्यामध्ये भजनी,कीर्तनकार व इतर कलावंतांना वृद्ध मानधन योजना काय आहे हे मुळीच माहीत नव्हते.

       अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष सोमनाथ गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली,गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात जाऊन अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समितीच्या प्रदेश कार्याध्यक्ष सारिकाताई उराडे यांनी तेथील वृध्द कलावंतांना,”वृद्ध मानधन योजना बाबत,आशेचा किरण दाखविला!………

      विदर्भाचे काशी म्हणून ओळखल्या जाणारे चामोर्शी तालुक्यातील एक गाव म्हणजे मार्कंडा देव!इथे ऐतिहासिक मंदिरे आहेत.त्यामुळे सदैव या गावात भजन,कीर्तन व इतर सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून जनजागृती अंतर्गत समाज प्रबोधन होत असते.

       ही मंडळी साधुसंतांचा वारसा सतत चालू राहावा म्हणून श्रद्धेने निशुल्क भजन कीर्तन करीत असतात.त्यांच्या भजनाचा मोबदला म्हणजे आरती मध्ये टाकलेला एकशे एक रुपयाची दक्षिणा होय!”असे भजन मंडळीचे समाज सेवा अन्वये वैशिष्ट्य आहे. 

      अशा प्रकारच्या अनेक भजन मंडळाची क्रियाशील नोंदणी करून या कलावंतांना मानधन फाईल तयार करण्यास प्रवृत्त केले.एवढेच नव्हे तर वृद्ध कलावंतांच्या फाईल तयार करण्यापासून तर मानधन मिळेपर्यंतची जबाबदारी सारिका ताईंनी हातात घेतल. त्यानुसार कार्यप्रणाली चालू केली.

         दिनांक 29/08/2024 ला गडचिरोली येथील जिल्हाधिकारी कार्यालय,जि.प.समाज कल्याण कार्यालय,जिल्हा परिषद कार्यालय,येथे सर्व कलावंत समवेत सारिका ताईंनी भेटी दिल्यात. 

       त्याप्रसंगी गडचिरोली येथील जिल्हाधिकारी संजय दैने म्हणाले की,ताई आपण चंद्रपूर जिल्ह्यापेक्षा गडचिरोली जिल्ह्यात मानधनाचे काम उत्कृष्ट करू असे खात्रीपूर्वक आश्वासन दिले.यामुळे वृद्ध कलावंतांना मोठा दिलासा दिला. 

*****

        अधिकाऱ्यांच्या भेटी प्रसंगी अखिल भारतीय कलावंत समितीचे खालील प्रमाणे सर्व पदाधिकारी व कलावंत उपस्थित होते…..

१) ह.भ.प.श्री.तुकाराम कोंडेकर

२) ह.भ.प.श्री.देवराव खांडेकर 

३) ह.भ.प.श्री.जीवनदास किनेकर 

४) ह.भ.प.विठ्ठल बुध्देवार .

५) वसंतराव तुकाराम मांदाडे

६) नानाची लक्ष्मण ठाकरे

७) रामचंद्र कोंडुजी धानोरकर

८) ह.भ.प.तुलाराम गेडाम

९) यशवंत नारायण उराडे

१०) वसंता आनंदराव करंडे

११) अशोक नामदेव किनेकर

१२) रमेश लक्ष्मण कुमरे

८) ह.भ.प.तुलाराम गेडाम

९) यशवंत नारायण उराडे

१०) वसंता आनंदराव करंडे

११) अशोक नामदेव किनेकर

१२) रमेश लक्ष्मण कुमरे

१३) एकनाथ झुंगाजी तांदूळकर

१४) रमेश परशुराम काकडे

१५) धनपाल कार

१६) दिगंबर शंकर शिवनकर

१६) बालाजी चिंतामण जराते

१७) दिवाकर मारुती जवादे

१८) सुखदेव नामदेव जवादे.

१९) रोशन वाळके

२०) सुरेश दुर्गे

२१) भास्कर उराडे

२२) विलास दुर्गे

२३) रवींद्र खोब्रागडे

२४) बरोशन वाळके

२५) सुरेश दुर्गे

२६) भास्कर उराडे

२७) विलास दुर्गे

२८) रवींद्र खोब्रागडे

२९) कुंडलीक मानका मीसार

३०) मुकुंदा पांडूरंग गरमडे