युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
दर्यापूर मतदार संघातील मोदी आवास योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेश वाटप करण्यात यावे या मागणीसाठी करिता ऍड संतोष कोल्हे यांच्या नेतृत्वात आक्रोश मोर्चाचे आयोजन आज करण्यात आले होते.
त्यामध्ये मोदी आवास योजनेअंतर्गत रखडलेला निधीचे लाभार्थ्यांना ताबडतोब धनादेशाचे वाटप करावे. तसेच धनगर व तत्सम जातीच्या जाती-जमातीच्या नागरिकांना घरकुलाचा लाभ देण्यात यावा ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थ्यांना शहरी भागाप्रमाणेच घरकुलाचा निधी वाढवून देण्यात यावा.
तसेच वयश्री योजनेची अर्ज स्वीकारण्याची मुदत वाढवून देण्यात यावी इत्यादी मागण्या साठी सकाळी 11 वाजता स्थानिक गांधी चौक येथून हा भव्य आक्रोश मोर्चा निघाला त्यात शेकडो घरकुल पिडीत स्त्री पुरुष मोठ्या संख्येने सामील झाले होते.
मुख्य मार्गाने हा भव्य आक्रोश मोर्चा स्थानिक उपविभागीय अधिकारी( महसूल) यांच्या कार्यालयावर धडकला तेथे “आक्रोश मोर्चा”चे आयोजक व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ऍड संतोष कोल्हे. पिडित जनतेच्या वतीने निवेदन दिले.
मोर्चा विसर्जनानंतर झालेल्या जाहीर सभेत बोलताना संतोष कोल्हे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.त्यात त्यांनी शासनाच्या तुघलकी कामकाजावर ताशेरे ओढले ते म्हणाले केंद्र व राज्य सरकारच्या योजनेतून देण्यात येणाऱ्या पंतप्रधान घरकुल आवास योजना व मोदी आवास योजना साठीचा कोट्यवधीचा निधी गेल्या अनेक महिन्यापासून दर्यापूर उपविभागात थकल्यामुळे संबंधित लाभार्थी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
मागील वर्षीच्या ओबीसी करता सुरू करण्यात आलेल्या मोदी आवास योजनेचे निधी शासनाकडे थकीत असल्याचे चित्र संपूर्ण मतदारसंघात आहे.पण त्या कडे गरिबांचे कैवारी म्हणवणारे तथाकथित पुढारी मात्र सामान्य जनतेच्या प्रश्नांना दुर्लक्ष करताना दिसत आहेत. एकीकडे सरकारकडे लाडक्या बहिणी योजनेच्या केवळ जाहिरातीवर 200 कोटी रुपये खर्च करायला शासनाजवळ पैसा आहे तर एकीकडे गरिबांना राहण्यासाठी घरकुलासाठी निधी उपलब्ध नाही हे या मतदारसंघातील गरीब जनतेची शोकांतिकाच आहे.
दर्यापुर मतदार संघातील शेतकरी सुद्धा मागील खरीप हंगामापासून अनुदानापासून वंचित असून शेतकरी वर्ग शासनाच्या दुर्लक्षामुळे हवालदिल झाला असुन शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत चालल्या आहेत ही बाब शासनास भुषणवाह नाही. शासनाने घरकुल पिडितांच्या समस्या तातडीने सोडवल्या नाही तर यापुढील मोर्चा हा विधानसभेवर समिती तर्फे धडकविण्यात येईल असे घोषणा एड. कोल्हे यांनी याप्रसंगी केली.
ह्या अभुतपुर्व मोर्चाच्या सफल योजनेकरिता व यशस्वितेसाठी शरद पाटील रोहणकर, प्रभाकर चौरपगार,अशोक दुधंडे, सुधिर तायडे, गजानन पाटील साखरे, राजेश कोल्हे, नागेश रायबोले, मिलिंद तायडे,सुरेंद्र तायडे, सोनोने गुरुजी ,महेंद्र कात्रे,पंकज अनासाने ,विजय दुधंडे इत्यादींनी परिश्रम घेतले.