युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ नांदगावचे वतीने नुकतेच संघटनेचे कमलाकर कदम यांच्या नेतृत्वात गट विकास अधिकारी प्रकाश नाटकर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या बाबत चर्चा केली.
याप्रसंगी शिक्षण विभागचे अधीक्षक प्रितम चर्जन, अमिता सिंगलवार, रत्नाकर मुळे, महेंद्र झिमटे, प्रतिक बोरकर, लेखा विभाग चे रुपेश देशमुख, शंकर कवाडे, उपस्थित होते.
संघटनेने निवेदन देवून शिक्षकांचे प्रलंबित समस्या सोडविण्याची प्रभाविपणे मागणी करण्यात आली.
माहे जुलै मध्ये ज्या शिक्षकांना नियमित वेतन मिळाले नाही अशा सर्व शिक्षकांचे वेतन मिळणे बाबत,हरितालिका/तान्हा पोळा स्थानिक सुटी घोषित करण्यात यावी.सेवानिवृत्त शिक्षिका अनिता कापडे यांचे एका महिन्याचे वेतन अदा करण्यात यावे.उषा पंडित सातपुते दाभा ह्या दीव्यांग मुलीचे पालक असल्याने त्यांची प्रतिनियुक्ती रद्द करण्यात यावी. सुनीता राऊत आणि इतर शिक्षक यांचे सातव्या वेतन आयोगातील वरिष्ठ श्रेणी याचिकेतील निर्णयाप्रमाणे त्रुटी दुरुस्त करण्यात याव्या. शिक्षकांचे समस्या सोडविण्याकरिता तक्रार निवारण सभा आयोजित करण्यात यावी.प्राथमिक शिक्षकांचे प्रलंबित वैद्यकीय देयके त्वरित निकाली काढण्यात यावे.अर्जित रजेवर असणारे शिक्षकांचे खाती रजा शिल्लक असताना वेतन कापण्यात येऊ नयेत व रजा तात्काळ मंजूर करून नियमित देयकांमध्ये वेतन करण्यात यावे अशी आग्रहि मागणी करण्यात आली.
समग्र शिक्षा अभियान निधी आणि ४% सादील निधी शालेय खात्यावर त्वरित जमा करण्यात यावा.प्रधान मंत्री शक्ती पोषण योजना भाजीपाला व इंधन करिता अग्रीम देण्यात यावा, आणि प्रति महिना खर्च वेळेवर देण्यात यावा.सातवा वेतन आयोगचा वेतन थकबाकी दुसरा, तिसरा व चौथा हप्ता त्वरित मिळनेबाबत.सेवा पुस्तिकेतील महत्त्वपूर्ण नोंदी करणेबाबत. सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांची सेवापूस्तके स्विकृतिकरिता पाठविनेबाबत.सर्व शिक्षकांचे फॉर्म न.१६ मिळनेबाबत. चटोपाध्याय प्रकरणे निकाली काढणेबाबत.यासह इतर अनेक प्रलंबित प्रश्नाबाबत प्रशासनाला अवगत करण्यात आले व समस्या निकाली न निघाल्यास आंदोलन करण्यात येईल असे कळविण्यात आले.
निवेदन देते वेळी कमलाकर कदम, पंजाबराव जोगे, सुरज मंडे, मनोज चोरपागार, जितेंद्र यावले, प्रशांत भगेवार, गजानन इंगळे, रवींद्र गजभिये, प्रशांत सापाने, दिनेश धूर्वे, हरीचंद्र मनोहर, प्रशांत गुल्हाणे, गुणवंत उपरीकर, समाधान मोहोड, धनंजय चाटे, हरिदास पाडर, नारायण पटके, निरंजन कारमोरे, प्रकाश बावनकुळे, बाळासाहेब राठोड, राजेंद्र जाधव, गजेंद्र खोलापुरे, संजय आडे, रविकुमार मेश्राम, राजू कांबळे, बलदेव घुगे, सीताराम जाधव, अर्जुन येरवाळ महिआघाडीच्या प्रमुख सुनीता राऊत, ज्ञानदेवी गणोरकर तेजस्विनी लोखंडे, ज्योती मंडलवार, रेखा सहारे, नलु ससाणे, अनिता जोशी, फुटाणे मॅडम यांचेसह अखिल परिवारातील बहुसंख्य सदस्य या प्रसंगी उपस्थित होते असे सूरज मंडे प्रसिद्धी प्रमुख यांनी कळविले आहे.