पारडी जिल्हा परिषद शाळा येथे केंद्र प्रमुख शाळा स्तरीय शिक्षण परिषद संपन्न..

 

कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

पारशिवनी:- 

       पारशिवनी पंचायत समितीच्या शिक्षण विभागा अंर्तगत समूह साधन केंद्र तामसवाडी केन्द शाळा अंतर्गत येणाऱ्या शिक्षकांची दिशा उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी शिक्षण परिषद जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पारडी येथे शिक्षण परिषद संपन्न झाली. 

           या शिक्षण परिषदेचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्या अर्चना दिपक भोयर यांचे शुभहस्ते करण्यात आले.

         अध्यक्षस्थानी ग्राम पंचायत पारडी सरपंच सौ स्वाती घारड तर प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच पुष्पा कोल्हे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रवींद्र डोईफोडे,ग्राम पंचायत सदस्य कृष्णा डोईफोडे,दर्शना महालगावे,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य रामराव घारड,प्रभारी केंद्र प्रमुख नंदकिशोर बावनकुळे प्रामुख्याने उपस्थित होते. 

        याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्या अर्चना भोयर यांनी शिक्षकांच्या व शाळेच्या भौतिक सुविधा संबंधाने असणाऱ्या अडचणी जाणून घेऊन प्रयत्नशील असल्याचे विषद केले.  

       मुख्याध्यापक खुशाल कापसे यांनी समाजाची मानसिकता आणि जिल्हा परिषद शिक्षण व्यवस्था याविषयी आपले मनोगत व्यक्त केले.

         दिशा उपक्रमाच्या अनुषंगाने इंग्रजी विषयावर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गरंडा येथील शिक्षक ओंकार पाटील यांनी यथोचित असे मार्गदर्शन केले तर गणित विषयावर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा डोरली येथील शिक्षक मनोज कुलसुंगे आणि मराठी विषयावर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक  शाळा तामसवाडी येथील शिक्षक शिवनारायण कामडे यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले. 

         कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विषय शिक्षक टेमराज माले, प्रास्ताविक प्रभारी केंद्र प्रमुख नंदकिशोर बावनकुळे यांनी तर आभाप्रदर्शन सहाय्यक शिक्षक प्रभाकर पिंगे  यांनी केले.