पालासावळी येथे गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव.. — जागृती कार्यक्रमातंर्गत शेती कार्यशाळा कार्यक्रम संपन्न.

 

     कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी. .

पारशिवनी:-

       तालुक्यातील पाळासावळी  येथे काल अंबुजा सिमेंट फाऊंडेशन उत्तम कापुस ‘अंतर्गत सावनेर लोकेशन मधील INMH-125 मधील मौजा -पालासावली येथे गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव संबंधान जागृती कार्यक्रम घेण्यात आला.

         सीआयटीआय,सीडीआरए आणि साऊथ एशिया बायोटेक्नॉलॉजी सेंटर जोधपूर आणि पीआय फाऊंडेशन,अंबुजा सिमेंट फाउंडेशन,”उत्तम कापूस, यांच्या संयुक्त विद्यमाने 28 ऑगस्ट 2023 रोजी नागपूर जिल्ह्यातील पालासावली येथे बंधन प्रकल्पाची जनजागृती आणि बंधन प्रकल्पाच्या पीबी नॉट तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक,अंतर्गत कार्यक्रमात तालुका विभागाचे अधिकारी सुरज शेडे,एसएबीसी,पीआय फाऊंडेशन,अॅग्रो व्हिजन फाऊंडेशनचे प्रतिनिधी या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

          या कार्यक्रमाला सहयोगी प्रकल्पातील ७५ शेतकरी उपस्थित होते..पालासावली ग्रामपंचायतचे सरपंच राजेन्द ठाकुर यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले.६५ एकरमध्ये संयुक्त प्रकल्प राबविण्यात येणार आहे.सरपंच राजेन्द ठाकूर,SABC चे संचालक डॉ.भगीरथ चौधरी,CICR तज्ञ शास्त्रज्ञ डॉ. रामकिशन,डॉ. ठुबे,डॉ. थेटे, CITI CDRA PC वायराळे यांनी शेतकर्‍यांना कापूस लागवड,गुलाबी बोंडअळी जागृती बाबत मार्गदर्शन केले.

           सहयोगी अंबुजा सिमेंट फॉउंडेशन प्रकल्पाच्या अधिकारी सिद्धार्थ चांदेकर,दिनेश ताडे यांच्या मदतीने शेती कार्यशाळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.